Dont give bonus by breaking pune municipal Corporations deposits Ujjwal Keskar

मागीलवर्षी अभय योजनेत सहभागी झालेल्या एक लाख ९२ हजार मिळकतधारकांपैकी बहुतांश जणांनी यंदा वेळेत मिळकत कराचा भरणा केला आहे. तसेच प्रशासनाने नव्याने अनेक मिळकतींची आकारणी केली आहे. त्यामुळे यावर्षी कर भरणाऱ्यांची संख्या वाढली असून उत्पन्न वाढीसही हातभार लागला आहे.

    पुणे : कोरोनामुळे लॉक डाऊन असतानाही महा पालिकेला चालू आर्थिक वर्षात पहिल्या दोन महिन्यात मिळकत करातून ७३६ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. तसेच मे महिन्यामध्ये एकाच महिन्यांत ५४६ कोटी रुपये मिळाले असून हा देखील एक उच्चांक आहे. दरम्यान ३१ मे पर्यंत मिळकतकर भरल्यास करामध्ये सूट देण्याच्या योजनेची मुदत ३० जून पर्यन्त वाढविण्याचा निर्णय आज स्थायी समितीने घेतला आहे.
    कोरोनामु

    ळे महापालिकेचे उत्पन्न घटले असताना सलग दुसऱ्या वर्षी मिळकतकर विभागाने तारले आहे. मागीलवर्षी कराच्या थकबाकीदारावरील दंडामध्ये सवलत देण्याची अभययोजना राबविण्यात आली होती. या योजनेत जवळपास एक लाख ९२ हजार थकबाकीदारांनी सुमारे ५०० कोटी रुपये थकबाकी भरली. त्यामुळे मागीलवर्षात पालिकेला सुमारे दीड हजार कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. त्याचवेळी पालिकेने नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकांवर अन्याय होऊ नये यासाठी पूर्वीच्या सवलतींसोबतच या मिळकत धारकांना अतिरिक्त १५ टक्के सवलत देण्यात आली होती.

    कोरोनामुळे यंदाचे आर्थिक वर्ष सुरू होतानाच एप्रिल मध्ये कोरोनाच्या लाटेमुळे पुन्हा लॉक डाऊन लावण्यात आला होता. सर्व व्यवसाय व रोजगार ठप्प असताना यंदा मिळकत कराचे उत्पन्न वाढणार का ,अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र पुणेकरांनी पहिल्या दोन महिन्यातच ७३६ कोटी रुपये इतका विक्रमी कर भरून शंका दूर केली. एकट्या मे महिन्यात तब्बल ५४६ कोटी रुपये कर भरणा झाला, हा आतापर्यंतचा उच्चांक असल्याचे मिळकत कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख सह आयुक्त विलास कानडे यांनी सांगितले.

    कानडे म्हणाले की, मागीलवर्षी अभय योजनेत सहभागी झालेल्या एक लाख ९२ हजार मिळकतधारकांपैकी बहुतांश जणांनी यंदा वेळेत मिळकत कराचा भरणा केला आहे. तसेच प्रशासनाने नव्याने अनेक मिळकतींची आकारणी केली आहे. त्यामुळे यावर्षी कर भरणाऱ्यांची संख्या वाढली असून उत्पन्न वाढीसही हातभार लागला आहे.