रस्त्याच्या कामाची ‘विक्रमी घाई’

इंदापूर : दीड वर्षापूर्वी बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रामवाडी ते निमगाव केतकी या अकरा किलोमीटरच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन झाले. सहा महिन्यांपूर्वी ठेकेदार कामाला लागला. दीड किलोमीटरचे काम त्याने राखून ठेवले. परिणामी आत्ताच्या पावसाळ्यात रस्त्यावर झालेल्या लांब रुंद खड्डे व साठलेल्या चिखलामुळे वाहने फसत आहेत.

रामवाडी-निमगाव केतकी रस्ता रखडला : ठेकेदाराने दीड किलाेमीटरचे काम ठेवले अर्धवट

इंदापूर : दीड वर्षापूर्वी बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रामवाडी ते निमगाव केतकी या अकरा किलोमीटरच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन झाले. सहा महिन्यांपूर्वी ठेकेदार कामाला लागला. दीड किलोमीटरचे काम त्याने राखून ठेवले. परिणामी आत्ताच्या पावसाळ्यात रस्त्यावर झालेल्या लांब रुंद खड्डे व साठलेल्या चिखलामुळे वाहने फसत आहेत. एखादा भीषण अपघात झाल्यानंतरच दखल घेतली जाईल की काय ? अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. रामवाडी गावच्या हद्दीतील आशीर्वाद कार्यालयाजवळच्या या रस्त्याचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दीड वर्षापूर्वी झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्याचे काम होणार होते. भूमिपूजनानंतर मागील सहा महिन्यांपूर्वी संबंधीत कामाच्या ठेकेदारास या कामाची आठवण झाली.

काम उरकण्याच्या हेतूने विक्रमी वेळात ठेकेदाराने रस्त्याचे काम केले. ते करताना निविदेत समाविष्ट नाही, असे कारण संबंधित ठेकेदाराने पुढे केले. लोणी देवकर ते निमगाव केतकी या कायमस्वरुपी प्रगतीपथावर असणाऱ्या रस्त्याच्या कामात रामवाडी रस्त्याचे दीड किलोमीटरच्या पट्ट्यातील काम करण्यात येईल, असे सांगून ते काम ठेकेदाराने राखून ठेवले आहे.

दूचाकी, चारचाकीवरील लोकांची त्रेधा
कामाची सुरुवात रामवाडीपासून करण्यात आली. निमगाव केतकीच्या अलिकडे ते काम थांबवण्यात आले. आधीच काम निकृष्ठ करण्यात आले. तर पुढचे काम राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे निमगाव केतकीहून रामवाडीकडे जाताना दीड किलोमीटरच्या पुढे दूचाकी, चारचाकीवरील लोकांची पार त्रेधा उडते.

खचलेल्या रस्त्यावर गाड्या अडकून पडतात
पावसामुळे पूर्ण खचलेल्या रस्त्यावर दररोज अनेक गाड्या अडकून पडतात. जीव मुठीत घेऊन लोकांना प्रवास करावा लागतो आहे. यंदाच्या पावसाळ्यात तर त्या रस्त्याच्या माहितीफलकाइतकीच रस्त्याची दुर्दशा झाली आहे. लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. जर व्यवस्थित कामच करायचे नव्हते तर भूमिपूजन का केले, असा सवाल लोकांमधून उपस्थित केला जात आहे.