आदिवासी उपाययोजनेतून बारा वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांच्या नोंदी कराव्यात

-माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी केली मागणी.

-माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी केली मागणी.      

                                                                                                                                                                                                                       भिमाशंकर :  आंबेगाव तालुक्यतील डिंबा धरणाच्या बुडीत क्षेत्रातील बोरघर ग्रामपंचायत लगत असलेल्या कातकरी समाजाने आदिवासी उपाययोजनेतून बांधण्यात आलेल्या घरांच्या नोंदी आजपर्यंत ग्रामपंचायतीमंध्ये झालेल्या नाहीत, त्यामुळे या समाजाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ यांना मिळत नाही, यासाठी संबंधित कुटुंबांच्या नोंदी लवकरात लवकर करण्यात याव्यात अशी मागणी आदिवासी विकास विभाग, ग्रामविकास विभाग, आयुक्त पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी केली आहे.    

घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांचे निधीतून डिंबा धरणाच्या बुडीत क्षेत्रातील बोरघर ग्रामंपचायत लगत कातकरी समाजाला १२ वर्षांपूर्वी घरकुले बांधून देण्यात आलेली आहेत. परंतु आजपर्यंत कोणत्याली घरकुलाच्या नोंदी ग्रामपंचायत बोरघरमध्ये करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ या कातकरी कुटुंबांना मिळत नाही. आदिवासी विकास विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्यातील समन्वयाअभावी नोंदी झालेल्या नाहीत.    

दरम्यान सन २०१६ मध्ये संबंधित कातकरी कुटुंबांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर गटविकास अधिकारी पंचायत समिती आंबेगाव यांनी जिल्हा परिषद पुणे, विभागीय आयुक्त पुणे यांचेमार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर केेला होता. परंतु या प्रस्तावावर अजुन कोणताही निर्णय झालेला नसल्याने संबंधित घरांच्या नांेदी ग्रामपंचायत दप्तरी करण्यात याव्यात अशी मागणी आदिवासी विकास विभाग, ग्रामविकास विभाग, जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे, आयुक्त पुणे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आदि संबंधित विभागांना लेखी निवेदनाव्दारे माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी केली आहे.