काॅंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना दिलासा ; नगरसेवक पद रद्द करण्याच्या निर्याणास उच्च न्यायालयाची स्थगिती

उच्च न्यायालयाने बागवे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या आदेशाला २३ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे, अशी माहीती काॅंग्रेस पक्षाने कळविली आहे.

    पुणे : काॅंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने २३ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे.
    अनधिकृत बांधकाम प्रकरणी पुण्यातील लघुवाद न्यायालयाने बागवे यांचे नगरसेवक पद रद्द ठरविले हाेते. या आदेशाच्या विराेधात बागवे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यांच्यावतीने ॲड. गिरीष गोडबोले यांनी युक्तिवाद केला. उच्च न्यायालयाने बागवे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या आदेशाला २३ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे, अशी माहीती काॅंग्रेस पक्षाने कळविली आहे.