चिंचवड महापालिकेच्या  यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमध्ये गोरगरीब, गरजू रुग्णांना दिलासा

शासकीय दरात आणि उत्तम सेवा मिळत असल्याने या रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी रुग्ण प्राधान्याने येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित केले होते.त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांची गैरसोय होत होती.आता वायसीएम रुग्णालय नॉन कोविड झाल्यामुळे शहरातील इतर आजारांच्या रुग्णांची सोय झाली आहे.

    पिंपरी: पिंपरी -चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) रुग्णालय कोविड समर्पित करण्यात आले होते.मात्र, सद्य:स्थितीत कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने रुग्णालय पुन्हा नॉनकोविड करण्यात आले आहे.त्यामुळे इतर आजार असलेले आणि शस्त्रक्रिया रखडलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.गेल्या महिन्यांमध्ये वायसीएम रुग्णालयामध्ये चारशेहून अधिक शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

    वायसीएम रुग्णालय हे पिंपरी -चिंचवड शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे.याठिकाणी ८०० बेडची क्षमता असून उपचारासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येत असतात. कोरोनामुळे अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या होत्या मे महिन्याच्या अखेर वायसीएम रुग्णालय नॉन कोविड करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा सर्व विभागातील उपचार आणि शस्त्रक्रिया सुरळीत सुरु झाल्या आहे. वायसीएम रुग्णालयात तब्बल ४०३ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

    महिलांच्या प्रसुती आणि शस्त्रक्रिया २५६ गेल्या महिन्यामध्ये झाल्या आहेत. त्यामध्ये १८६ गुंतागुंतीच्या आणि ६७ छोट्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दंत विभागामध्ये १५, नाक , कान, घसा विभागात ४४ तर हाडांच्या विभागात २४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामध्ये किचकट आणि अति गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा समावेश नाही.दुर्बिणीच्या सहाय्याने ६४ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये वायसीएम रुग्णालय एकच मोठे रुग्णालय असल्याने या रुग्णालयावर बहुतांश रुग्ण अवलंबून असतात.तसेच शासकीय दरात आणि उत्तम सेवा मिळत असल्याने या रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी रुग्ण प्राधान्याने येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित केले होते.त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांची गैरसोय होत होती.आता वायसीएम रुग्णालय नॉन कोविड झाल्यामुळे शहरातील इतर आजारांच्या रुग्णांची सोय झाली आहे.

    रुग्णालयामध्ये सर्व विभाग सुरळीत झाले आहेत.शस्त्रक्रियांनाही सुरुवात झाली आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ज्या शस्त्रक्रिया पुढे ढकलणे शक्य होत्या त्या पुढे ढकलल्या होत्या. आता रुग्णालय नॉन कोविड झाल्यामुळे त्या शस्त्रक्रिया सुरळीत सुरु झाल्या आहेत. जून महिन्यामध्ये सुमारे ४०० हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.'' - डॉ.राजेंद्र वाबळे, (अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय )