बारामतीतील व्यापाऱ्यांना दिलासा ; उदयापासून ९ ते १ वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार

बारामती शहरात गेल्या तीन महिन्यांपासून असणारा कोरोनाचा आलेख घसरण्यास सुरुवात झाली आहे.एप्रिल मध्ये जवळपास दररोज ४०० च्या घरात शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधित आढळण्यास सुरवात झाली होती.त्यामुळे ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी बारामती शहर व तालुक्यात दि ५ एप्रिल पासून कडकडीत लाॅकडाऊन सुरू करण्यात आले होते.

    बारामती : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेल्या बारामती शहर व तालुक्यातील व्यापारी वर्गासह नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.मंगळवार(दि ८) पासून बारामती शहरातील सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. तर किराणा व भाजीपाला विक्रीची दुकाने ९ ते ४ वाजेपर्यंत ‌सुरु राहणार आहेत.१५ जूनपर्यंत ही वेळ कायम राहणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.बारामतीत या २४ तासात केवळ ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

    बारामती शहरात गेल्या तीन महिन्यांपासून असणारा कोरोनाचा आलेख घसरण्यास सुरुवात झाली आहे.एप्रिल मध्ये जवळपास दररोज ४०० च्या घरात शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधित आढळण्यास सुरवात झाली होती.त्यामुळे ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी बारामती शहर व तालुक्यात दि ५ एप्रिल पासून कडकडीत लाॅकडाऊन सुरू करण्यात आले होते. दरम्यान बारामती शहरातील व्यापारी महासंघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठीदुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. सुदैवाने बारामतीतील स्वप्न संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने मंगळवारपासुन काही वेळ का होईना दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याचे सुत्रांनी सांगितले.

    सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली राहणार आहेत.तर अत्यावश्यक वर्गातील दुकानांची वेळ आता वाढविण्यात आली आहे.किराणा,भाजीपाला,दूध आदी अत्यावश्यक सेवेअंतर्गत असणारी दुकानांची वेळ यापुर्वी ११ वाजेपर्यंत होती.आता हि वेळ मंगळवारपासून ४ वाजेपर्यंत असणार आहे.