नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य लक्षात आणून द्या : मंत्री दिलीप वळसे पाटील

मंचर: प्रशासनाने कायदेशीर मार्गाचा अवलंब करुन नागरिकांमध्ये कोरोनाचे  (Corona Pandemic)गांभीर्य लक्षात आणून दिले पाहिजे. ऑक्सिजन बेडची संख्या वाढविणे,औषधे वेळेवर मिळणे,आरोग्य कर्मचाऱ्यांनी कमतरता यांबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करुन कार्यवाही करावी, असे आवाहन कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil)यांनी बुधवारी केले.

अवसरी फाटा (ता.आंबेगाव) येथे तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि उपाययोजना यासंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस प्रमुख संदिप पाटील, मंचर विभागाचे प्रांत अधिकारी सारंग कोडिलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एन. बहिर, तहसिलदार रमा जोशी, सहाय्यक गटविकास अधिकारी जयराम लहामटे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे, मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.चंदाराणी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर, विशेष कार्यकारी अधिकारी एस.बी.भोर, भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटलचे विश्वस्त डॉ.श्रीरंग फडतरे, मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे, प्रदिप पवार आदी उपस्थित होते.

-कठोर उपाययोजना कराव्यात
पाटील म्हणाले की, कोरोना संदर्भात ग्रामीण भागात फारशी जनजागृती होत नाही. तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आणि मृत्युदर वाढत आहे. प्रशासनाने समन्वयाने काम करुन मृत्युदर आणि रुग्ण संख्या वाढणार नाही. यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. मंचर उपजिल्हा रुग्णालय पुर्णता कोविड सेंटर करुन तेथे होणारे बाळंतपणासाठी िकंवा इतर महत्वाच्या रुग्णांसाठी इतर खाजगी हॉस्पिटल अधिगृहण करावे.
­

-५ पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्रितपणे येवु नये
जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र देशमुख म्हणाले की, कोरोनाबाबत सर्व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करुन कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे .विवाह समारंभ िकंवा इतर उत्सव एकत्रितपणे साजरे होतात. त्यामध्ये नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांनी कठोर उपाययोजना कराव्यात. औषधे िकंवा इतर साधनसामग्री लागल्यास ती तातडीने दिली जाईल. खाजगी डॉक्टरांची मदत घेवुन कोरोनाग्रस्त रुग्णांवर वैद्यकीय उपचार करावेत. आयुष प्रसाद म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पोलिसांनी मास्क न वापरता फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी. जिल्हा पोलिस प्रमुख संदिप पाटील म्हणाले की, सार्वजनिक उत्सव िकंवा खाजगी कार्यक्रम यामध्ये ५ पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्रितपणे येवु नये. तसेच पोलिसांनी कठोर उपाययोजना करुन कायद्याचा बडगा उचलुन कारवाई करावी. त्या माध्यमातुन नागरिक महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर पडणार नाही. याची काळजी घ्यावी.