Video : प्रार्थनास्थळ पुन्हा खुले करा; भाजप आक्रमक

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रार्थनास्थळ उघडण्यासाठी पुन्हा एकदा घोषणा आणि आंदोलन छेडले.

    पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाउनची घोषणा केली. मात्र, मंदिर ही लॉकडाउनच्या अगोदर बंद करण्यात आली. ज्यामुळे सगळेच प्रार्थनास्थळ बंद झाले. याच्या परिणाम तिथल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर होऊ लागला. फुले, हार, विक्रेते, प्रसाद विक्रेते, पुजारी असे अन्य व्यावसायिक आहेत, ज्याची रोजी रोटी बंद झाली आहे. मात्र, त्याच्यासाठीही सरकारने काही ठोस पावले उचलली नाही. त्यांना आर्थिक मदत केली.

    भाजपच्या वतीने पहिल्या लॉकडाउननंतर मंदिर उघडण्यासाठी जोरदार निषेध आंदोलन केली होती. म्हणून सरकारला मंदिर उघडायचा निर्णय घ्यावा लागला. मंदिर उघडल्यानंतर कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वाढू लागला. म्हणून सरकारने परत मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला. आता तिसरी लाटेची शक्यता वर्तवली आहे.

    पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रार्थनास्थळ उघडण्यासाठी पुन्हा एकदा घोषणा आणि आंदोलन छेडत त्याचसोबत सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकारने दारूची दुकान उघडली. मात्र, मंदिर उघडल्याला अडचण आहेत.