राखीव खाटा दुसऱ्या उपचाराकरीता उपलब्ध ; पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय

काेराेनाच्या कालावधीत खाटा कमी पडू लागल्यामुळे महापािलकेने शहरातील सर्वच खाजगी रूग्णालयांमधील ८० टक्के खाटा या काेराेना बाधित रुग्णांवरील उपचारासाठी राखीव ठेवण्याचे बंधन घातले हाेते. या नियंत्रित केलेल्या खटांपैकी ५० टक्के कोरोनाबाधितांच्या खाटा आता अन्य रूग्णांकरिता खुल्या करण्याचा निर्णय महापािलकेने नुकताच घेतला हाेता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेतील शहरातील मोठ्या रूग्णालयांसह लहान रूग्णालयांमधीलही साध्या, आॅक्सिजन, आय़सी़यू, व्हेंटिलेटर खाटा कोरोनाबाधितांसाठी राखीव केल्या होत्या.

    पुणे : शहरातील काेराेना बाधित सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाल्याने नियंत्रणात आल्यानंतर खासगी रुग्णालयात राखीव ठेवण्यात आलेल्या खाटा आता इतर आजारावरील उपचाराकरीता उपलब्ध केल्या जाऊ लागल्या आहेत.

    काेराेनाच्या कालावधीत खाटा कमी पडू लागल्यामुळे महापािलकेने शहरातील सर्वच खाजगी रूग्णालयांमधील ८० टक्के खाटा या काेराेना बाधित रुग्णांवरील उपचारासाठी राखीव ठेवण्याचे बंधन घातले हाेते. या नियंत्रित केलेल्या खटांपैकी ५० टक्के कोरोनाबाधितांच्या खाटा आता अन्य रूग्णांकरिता खुल्या करण्याचा निर्णय महापािलकेने नुकताच घेतला हाेता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेतील शहरातील मोठ्या रूग्णालयांसह लहान रूग्णालयांमधीलही साध्या, आॅक्सिजन, आय़सी़यू, व्हेंटिलेटर खाटा कोरोनाबाधितांसाठी राखीव केल्या होत्या़ यामध्ये रूग्णालयांमधील एकूण खाटांच्या क्षमतेच्या ८० टक्के खाटा या कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते़ मात्र सद्यस्थितीला कोरोनाचा संसर्ग अटोक्यात आल्याने व रूग्णसंख्याही ३ हजाराच्या आसपास आल्याने सर्व मोठ्या खाजगी रूग्णालयांना ५० टक्के राखीव खाटा अन्य रूग्णांसाठी वर्ग करण्याची परवागनी दिली आहे़ मात्र कोरोनाचा यदाकदाचित पुन्हा प्रादुर्भाव वाढल्यास दोन दिवसात या खाटा कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्याची सूचनाही महापालिकेने सर्व रूग्णालयांना केली असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.