पुणे शहरातील निर्बंध कायम ; महापालिका आयुक्तांची माहिती

विविध व्यापारी संघटनांकडून दुकाने सुरु ठेवण्याची वेळ दुपारी चारऐवजी रात्री आठपर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी केली जात हाेती. यामागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करीत आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरात यापुढेही आत्तापर्यंतचे नियम कायम लागू केले आहे.

    पुणे : दुकाने सुरु ठेवण्याची वेळ वाढवून देण्याच्या मागणीसंदर्भात अद्याप राज्य सरकारकडून काेणत्याच सुचना आल्या नाहीत. यामुळे महापालिका आयुक्तांनी शहरात सध्या काेराेना नियंत्रणासाठी लागू केलेले निर्बंध कायम ठेवले आहे. यासंदर्भातील आदेश त्यांनी शनिवारी जारी केले.

    विविध व्यापारी संघटनांकडून दुकाने सुरु ठेवण्याची वेळ दुपारी चारऐवजी रात्री आठपर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी केली जात हाेती. यामागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करीत आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरात यापुढेही आत्तापर्यंतचे नियम कायम लागू केले आहे. यासंदर्भात त्यांनी शनिवारी आदेश काढले आहेत. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित असून, गेल्या महिन्याभरापासून बाधितांचा दर देखील पाच पेक्षा कमी आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार पुण्याचा स्तर दोन मध्ये समावेश होतो. मात्र, तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात तिसऱ्या स्तरातील नियम लागू केल्याने पुण्यात निर्बंध वाढले आहेत. सध्याच्या निर्बंधानुसार दुकाने दुपारी चार पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानांना शनिवारी व रविवारी बंद ठेवावी लागत आहेत. शहरातील शाळा, महाविद्यालये यासह सर्व शैक्षणिक संस्था बंद असतील. आॅनलाइन शिक्षण सुरू असेल, असेही आदेशात नमूद केले आहे. हे आदेश पुणे कॅन्टोन्‍मेंट व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला देखील लागू आहेत.