एल्गार परिषद भरवण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांचा पुणे पोलिसांकडे अर्ज

दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यातील शनिवारवाडा या ठिकाणी एल्गार परिषद भरविण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. या संदर्भातील मागणीसाठी त्यांनी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशन येथे अर्जही केला आहे

दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यातील शनिवारवाडा या ठिकाणी एल्गार परिषद भरविण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. या संदर्भातील मागणीसाठी त्यांनी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशन येथे अर्जही केला आहे.

पोलिसांना केलेल्या बी जी कोळसे पाटील यांनी गणेश कला क्रीडा रंगमंच पुणे या ठिकाणी कार्यक्रमासाठी परवानगी मिळावी असे म्हटले आहे. एल्गार परिषदेला परवानगी द्यावी की नाही याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. दरम्यान, एल्गार परिषदेबाबतची एक बैठक नुकतीच पुणे येथे पार पडली. या बैठकीची माहिती देताना परिषदेने म्हटले आहे की, कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरातील अनुयायी १ जानेवारीस दरवर्षी येत असतात. याच निमित्ताने एल्गार परिषदेचे आयोजनही करण्यात आले आहे. यंदा ही परिषद गणेश कला-क्रीडा केंद्रात घेण्यात येणार असल्याचा निर्णय झाल्याचे परिषदेने म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांच्या परवानगीवरच सर्व काही अवलंबून असल्याचे सध्या तरी सांगण्यात येत आहे.

राज्य आणि देशभरात कोरोना व्हायरस संकटाचे सावट अद्यापही दूर झाले नाही. त्यातच राज्यसरकारने रात्रीच्या वेळेत संचारबंदीचे आदेश लागू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनावर सोपवले आहेत. या पार्श्वभूमीवर एल्गार परिषद घेण्यास माजी न्यायाधिश कोळसे पाटील यांना परवानगी मिळते का? याबाबत उत्सुकता आहे.