एकाच दिवसात ३१ लाखांचा महसूल जमा ; १ लाख डिजिटल सातबारा उतारे डाउनलोड

''महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. यामागे राज्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल अधिकारी यांचे कठोर परिश्रम आहेत. '' असे ई- फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक व उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले आहे

  पुणे: राज्यात एकाच दिवसात एक लाख डिजिटल सातबारा उतारे डाउनलोड झाले असून नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. तर एकाच दिवसात सर्वाधिक सर्वाधिक ३१ लाख ५० हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. सोमवारी हा नवा उच्चांक नोंदला गेला आहे.

  महसूल विभागाने शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन सातबारा उतारा उपलब्ध व्हावा. या उद्देशाने डिजिटल सातबारा उतारा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुविधांमुळे सामान्य शेतकऱ्यांच्या जमीनविषयक आणि सातबाराबाबतच्या अनेक समस्या दूर झाल्या आहेत. याबरोबरच इतर ऑनलाईन सेवाही विभागाच्या वतीने सुरु करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, खाते उतारे आणि मिळकत पत्रिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी महाभूमी पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल सध्या सर्वच खातेदारांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येत आहे.

  ”महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. यामागे राज्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल अधिकारी यांचे कठोर परिश्रम आहेत. ” असे ई- फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक व उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले आहे

  -सोमवारी झालेली एका दिवसाची नोंद
  ऑनलाइन दस्त नोंदणीची संख्या – ४५३१
  ऑनलाइन फेरफार संख्या – १२१३२
  ऑनलाइन निर्गत फेरफारची संख्या – १००६३
  नोटीस तयार केलेल्या फेरफारची संख्या – ११०१३
  तलाठी स्तरावरून अभिलेख वितरण प्रणालीतून वितरीत सातबारा व खाते उतारे संख्या- २ लाख ८६ हजार ५८०.
  पीक कर्जासाठी बँकांनी घेतलेल्या ऑनलाइन सातबारा व खाते उतारे संख्या – १० हजार.
  पीक विमा योजनेसाठी वापरलेल्या सातबाराची संख्या – १ लाख ३४ हजार.
  भूलेखवरून मोफत मिळविलेल्या सातबारा – ५ लाख २ हजार.
  एका दिवसात नक्कल शुल्कद्वारे जमा झालेला महसूल – ३१ लाख ५० हजार रूपये.