प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

    पुणे : रिक्षा प्रवासी १६ वर्षीय मुलीचा विनयभंग करून पसार झालेल्या रिक्षाचालकाला दत्तवाडी पोलीसांनी रेखाचित्राच्या माध्यमातून अटक केली. पोलीसांनी तब्बल १०० सीसीटीव्ही पडताळत त्याचा माग काढला. त्याने रिक्षा थांबवून मोबाईलमधील काही कळत नसल्याच्या बहाण्याने तो पाठीमागे बसला व तिचा विनयभंग केला होता.

    अरविंद वामन घोलप (वय ६०, रा. पर्वती) असे अटक केलेल्याचे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पीडित मुलगी कोथरूड परिसरात क्लाससाठी गेली होती. क्लास झाल्यानंतर ती कोथरूडवरून दत्तवाडीत येत होती. घरी येण्यासाठी तिने व मैत्रिणीने रिक्षा केली. रिक्षातून येत असताना मैत्रिण तिचे घर आल्यानंतरमध्ये उतरली. पीडित मुलगी रिक्षात येत होती. यावेळी दत्तवाडी परिसरात आल्यानंतर रिक्षा चालकाने अंधारात रिक्षा थांबवली. मला मोबाईलमधले कळत नाही, असे म्हणत तिच्याजवळ जाऊन बसला. तसेच, तिच्याशी अश्लील चाळे केले. मुलगी यामुळे घाबरली आणि रिक्षातून उतरत पळून गेली. त्यानंतर तिने हा प्रकार पालकांना सांगितला. त्यांनी तात्काळ दत्तवाडी पोलीसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.

    गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत दत्तवाडी पोलीसांनी त्याचा शोध सुरू केला. पण, त्याच्या रिक्षाला क्रमांक नव्हता. पोलीसांनी सीआयडी येथे पोलिसांना रेखाचित्र प्रशिक्षण देणारे प्रा. गिरीष चरवढ यांना बोलवून या रिक्षा चालकाचे रेखाचित्र काढले. ते रेखाचित्र व पीडित मुलीने सांगितलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात रिक्षा आढळून आला. त्याचवेळी कर्मचारी विष्णू सुतार, पुरूषोत्तम गुन्ला आणि शिवाजी क्षीरसागर यांना पर्वती येथे रेखाचित्रामध्ये दिसणारा रिक्षा चालक उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला पकडण्यात आले. चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

    पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक विजय खोमणे निरीक्षक स्वप्नील लोहार, कुंदन शिंदे, राजू जाधव, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे, शिवाजी क्षिरसागर, शरद राऊत, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, प्रमोद भोसले, विष्णू सुतार, पुरुषोत्तम गुन्ला व राहुल ओलेकर यांच्या पथकाने केली आहे.