अचानक थांबलेल्या बसवर रिक्षा आदळून रिक्षाचालकाचा मृत्यू : एक जखमी

रिक्षाचालक नितीन थोरात आणि त्याचा मित्र सुहास गायकवाड हे दोघे रिक्षातून जलशुद्धीकरण केंद्र, म्हेत्रेवस्ती येथून कृष्णानगर चौकाकडे जात होते. कृष्णानगर चौकाजवळ रिक्षापुढे जाणारी बस अचानक थांबल्याने रिक्षा बसच्या पाठीमागील भागास धडकली. यात गंभीर जखमी झाल्याने रिक्षाचालक थोरात यांचा मृत्यू झाला.

    पिंपरी: अचानक थांबलेल्या बसला पाठीमागून रिक्षा धडकली. यात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला तसेच एक जखमी झाला. चिखली येथे स्पाईन रस्त्यावर कृष्णानगर चौकाजवळ हा अपघात घडला. नितीन भागवत थोरात (वय २८) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. सुहास आगतराव गायकवाड (वय ३१) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. पोलीस कर्मचारी प्रकाश परब यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बसचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    रिक्षाचालक नितीन थोरात आणि त्याचा मित्र सुहास गायकवाड हे दोघे रिक्षातून जलशुद्धीकरण केंद्र, म्हेत्रेवस्ती येथून कृष्णानगर चौकाकडे जात होते. कृष्णानगर चौकाजवळ रिक्षापुढे जाणारी बस अचानक थांबल्याने रिक्षा बसच्या पाठीमागील भागास धडकली. यात गंभीर जखमी झाल्याने रिक्षाचालक थोरात यांचा मृत्यू झाला. रिक्षात पाठीमागे बसलेला सुहास हा जखमी झाला. तसेच रिक्षाचेही नुकसान झाले.