नदी सुधार प्रकल्पाला गती मिळणार, राज्य सरकार सकारात्मक ; नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या नद्या वाहतात. नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी,घनकचरा, प्लॉस्टिक कचरा तसेच नदीच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अनाधिकृत रोडारोडा,भराव अनाधिकृत बांधकाम,शेड इत्यादी होत असल्यामुळे नद्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पुर्नज्जीवन प्रकल्प राबविण्याची मागणी मी केली होती

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पुर्नज्जीवन प्रकल्पाबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळणार आहे. हा प्रकल्प सुरू होण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. राज्य सरकार, महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. त्याला यश येत असून लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होईल, असा विश्वास नगरसेवक संदीप वाघेरे यांनी व्यक्त केला. नदीपात्रातील ब्ल्यू, रेड लाईन मधील जमिनी फ्री होल्ड होतील. त्यातून महापालिकेला मोठा निधी उपलब्ध होईल असा विश्वासही वाघेरे यांनी व्यक्त केला.

    नगरसेवक वाघेरे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा या नद्या वाहतात. नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी,घनकचरा, प्लॉस्टिक कचरा तसेच नदीच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अनाधिकृत रोडारोडा,भराव अनाधिकृत बांधकाम,शेड इत्यादी होत असल्यामुळे नद्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पुर्नज्जीवन प्रकल्प राबविण्याची मागणी मी केली होती. त्याबाबत वारंवार पाठपुरावा केला. महासभेत आवाज उठविला. राज्य सरकार, महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला.

    त्यानंतर महापालिका प्रशासनाने नदीचे पुर्नज्जीवन करुन दोन्ही नदीकाठ विकसित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचा अंतर्भाव करुन पवना, इंद्रायणी नदी पात्रांचा पूर्ण सर्व्हे केला. नदी पुर्नज्जीवन प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल तयार केला. त्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर सादरणीकरण करण्यात आले. त्यांनी पवना व इंद्रायणी नद्यांच्या पुर्नज्जीवन प्रकल्प राबविण्याबाबत हिरवा कंदिल दाखविला. महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण कमिटीची मान्यता (पर्यांवरण ना हरकत) देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारने तत्काळ मंजुरी द्यावी. महापालिकेने बॉण्डच्या माध्यमातून निधी उभारावा आणि कामाला सुरुवात करावी, असे नगरसेवक वाघेरे यांनी म्हटले आहे.