नीरा नदीला आलेला पूर 
नीरा नदीला आलेला पूर 

अविनाश हुंबरे, बारामती :  राज्यभरात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नीरा नदीला पूर आल्याने लोकांचे जीवनमान विस्कळीत झालेले पाहायला मिळाले. परिसरातील शेतात पाणीच पाणी होऊन, विजपुरवठा खंडित झालेला, तसेच संपूर्ण मोबाईल सुविधा देखील काही तास विस्कळीत झाली होती.

अविनाश हुंबरे, बारामती :  राज्यभरात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नीरा नदीला पूर आल्याने लोकांचे जीवनमान विस्कळीत झालेले पाहायला मिळाले. परिसरातील शेतात पाणीच पाणी होऊन, विजपुरवठा खंडित झालेला, तसेच संपूर्ण मोबाईल सुविधा देखील काही तास विस्कळीत झाली होती. बुधवारी  ( दि.१४ ) रोजी वीर धरणामधून नीरा नदी मध्ये ६०० क्युसेक वेगाने विसर्ग विद्युतगृहातुन सुरू होता. त्यानंतर वीर धरणाच्या सांडव्यातून संध्याकाळी सात वाजता २३ हजार १८५ क्युसेक  वेगाने  विसर्ग सुरू करण्यात आला होता. गुरुवारी (दि.१५) रोजी पहाटेच्या दरम्यान ५३ हजार ८४७ क्युसेक वेगाने पान्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सांगवी ( ता. बारामती ) येथील नीरा नदी वरील पुलावरून पहाटेच्या दरम्यान पाणी मोठ्या प्रवाहाने वाहू लागले होते. त्यानंतर पाणी कमी होऊन पूलाला पाणी टेकू लागले आहे.अतिवृष्टीमुळे  शेजारील  गावात अनेक ठिकाणी पुराचे पाणी घरा-घरात, शेतात शिरले आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, वाड्या वस्त्यांवर जाणारे ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. यामुळे वाड्या वस्त्याचा संपर्क तुटला आहे. लोकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. यामुळे नदीच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बारामती फलटण रस्त्यावरील पाहुणेवाडी येथील वळणावरील रस्ता पूर्णपणे खचला आहे. यामुळे वाहने माघारी फिरत असून  हजारो लोकांचा संपर्क तुटला आहे. पाहुणेवाडी येथे असणाऱ्या ओढ्यावरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला आहे. यामुळे सर्व वाहतूक माळेगाव मार्गे सोडण्यात येत आहे.

पाहुणेवाडी येथील फलटण रस्त्यावरील तूटलेला पूल

दरवर्षी मुसळधार पावसात ओढ्याला पूर आल्यानंतर हा पूल वाहून जात असतो, या पुलासाठी शासनाचे लाखो रूपये पाण्यात जात आहेत. यामुळे प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. यामुळे अतिदक्षता म्हणून  प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन येथील पूल नवीन मजबुत बांधावा अशी मागणी ग्रामस्थ व वाहन चालक करीत आहेत. तर रात्री पासून सांगवी परिसरात विजपुरवठा खंडित झाला होता. तर पहाटेपासून दुपार पर्यंत जवळपास सर्वच मोबाईलचे नेटवर्क व इंटरनेट सुविधा विस्कळीत झाली होती. यामुळे मोबाईलवरून एकमेकांना संभाषण करणे देखील मुश्किल झाले होते.