नगरसेवक अविनाश घुले यांची पालिका प्रशासनाकडे मागणी अहमदनगर: नगर शहरात प्रभाग क्रमांक ११ मधील आशिर्वाद कॉलनी,कानडे मळा परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पहिल्याच पावसात या रस्त्यात जागोजागी

नगरसेवक अविनाश घुले यांची पालिका प्रशासनाकडे मागणी

अहमदनगर: नगर शहरात प्रभाग क्रमांक ११ मधील आशिर्वाद कॉलनी,कानडे मळा परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पहिल्याच पावसात या रस्त्यात जागोजागी खड्डे पडले असून नागरिकांना घराकडे जातांना खड्डे,चिखलातून वाट काढत जावे लागत आहे. तसेच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.नागरिकांनी याबाबत नगरसेवक अविनाश घुले यांना सांगितले असता त्यांनी या भागात येऊन रस्त्याची पाहणी केली. या प्रसंगी भाऊ साहेब गोड,गोरख भदर,अशोक शिंदे,बापू आजबे,बाळू काळोखे, संजय हिंगणे, प्रशांत मुथा, डॉ.अजय टाक, गणेश भदर, शरद काळे, उमेश सुंबे आदि उपस्थित होते.

यावेळी अविनाश घुले यांनी या भागातील रस्त्यांची पाहणी करुन पहिल्याच पावसात हे रस्ते खराब झाले असून, तातडीने ते दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने मनपा अधिकार्‍यांना कळवून सध्या तत्पुर त्या स्वरुपात बुजविण्याची कार्यवाही करावी,अशा सूचना केल्या. पुढील काळात या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन देऊन नवीन रस्ता तयार करण्यात येईल,असेही घुले यांनी सांगितले. तसेच दत्त मंदिर भागातून जात असले ल्या भिंगार नाल्यात झाडे-झुडपे वाढले होते. त्याचप्रमाणे रॉ मटेरिअलही टाकल्यामुळे हा ओढा अरुंद झाला होता.त्या मुळे पावसाळ्यात या ओढ्यातील पाणी रस्त्यावर येत असल्याने रस्तेही खराब झाला होते. त्यामुळे नागरिकांना जाण्या-येण्यास अडचणी निर्माण होत होत्या. अविनाश घुले यांनी याबाबत मनपा प्रशासनास कळवून तातडीने पावसाळ्यापूर्वी या नाल्याची साफसफाई करण्याचे काम हाती घेऊन हा नाला साफ केला.पाण्याचा निचरा होऊन ओढा ही मोठा झाला असल्याने आता पावसाचे पाणी व्यवस्थीत जाईल.याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.