अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला, निगडी पोलिसांत तक्रार दाखल

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या निगडीतील घरी चोरीचा प्रयत्न झाला. यावेळी चोरट्याने सोनाली यांच्या वडिलांवर चाकूने वार केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत. अजय शेगटे( वय २८ ) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

    मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या घरी अज्ञाताने घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे. सोनाली कुलकर्णी यांच्या घरी वडिलांवर अज्ञाताने हल्ला केला आहे. या प्रकरणी निगडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा निगडी पोलिस तपास करत आहेत.

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या निगडीतील घरी चोरीचा प्रयत्न झाला. यावेळी चोरट्याने सोनाली यांच्या वडिलांवर चाकूने वार केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत. अजय शेगटे( वय २८ ) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

    om/entertainment-news-marathi/actress-prathana-behare-sell-her-painting-for-covid-fund-nrst-133724/”]

    सकाळी सातच्या सुमारास अजय हा त्यांच्या घरात शिरला त्यावेळी घरी सोनाली यांचे आई वडील होते. चोरीचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोनाली यांच्या वडिलांनी त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने चाकूने त्यांच्यावर वार केला. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले याबाबत परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी अजयला पकडले. त्यावेळी त्यांच्यातही झटापट झाली नागरिकांनी पोलिसांना कळविताच काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आजयला ताब्यात घेतले. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.