दरोडा टाकणारी टोळकी पुणे ग्रामीण पोलिसांकडून जेरबंद

शिरूर : ट्रक हायजॅक करून दरोडा टाकुन लुटून नेणा-या आंतरराज्य टोळीचा पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने च पाटलाग करत ४ कोटी ९१ लाख ७९ हजार ५०० रूपये किंमतीचा माल हस्तगत करून सात आरोपींना जेरबंद केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

 शिरूर :  ट्रक हायजॅक करून दरोडा टाकुन लुटून नेणा-या आंतरराज्य टोळीचा पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने च पाटलाग करत ४ कोटी ९१ लाख ७९ हजार ५०० रूपये किंमतीचा माल हस्तगत करून सात आरोपींना जेरबंद केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

             याबाबत दिलेले माहिती अशी की,यवत पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीत कंटेनर हायजॅक करून मेडीसीन लुटलेबाबत गुन्हा दाखल होता सदर गुन्हयाचा तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील,अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड,पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे,सहा.फौज.दत्तात्रय गिरीमकर,दयानंद लिमण, पो.ना.राजू मोमीन, जनार्दन शेळके, पो.हवा.महेश
गायकवाड, उमाकांत कुंजीर, मुकुंद अयाचित, मोरेश्वर इनामदार, राजेंद्र पुणेकर, अनिल काळे, रविराज कोकरे, पो.ना.विजय कांचन, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, गुरू जाधव, रौफ इनामदार, पो.कॉ.धिरज जाधव, पो.ना.प्रमोद नवले, चा.पो.हवा.सावंत, अक्षय जावळे यांचे पथकामार्फत समांतर तपास चालु होता.तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी निष्पन्न करून मध्यप्रदेशातील देवास,इंदोर या भागात जाऊन त्यांची इत्यंभुत माहीती गोळा करून संशयीत आरोपींचे फोटो हस्तगत केले होते.
      बुधवार दि. २४/०६/२०२० रोजी उशीरा स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांचे पथक पेट्रोलींग करीत असताना त्यांनी निष्पन्न केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा एका ट्रकमधून चौफुला बाजूकडून शिरूर बाजूकडे जाताना दिसला त्याचे मागील बाजूस नंबरप्लेट नव्हती त्यामुळे संशय बळावल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रकचा चित्तथरारक पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू असताना टूक अहमदनगर बाजूकडे भरधाव वेगाने जात असल्याचे दिसताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मदतीकरीता शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरदेव काबुगडे, पो.कॉ. जितेंद्र मांडगे, सुदाम खोडदे, कल्पेश राखुंडे यांचे पथकास बोलावून शिरूरच्या सतराकमान पुल येथे नाकाबंदी करून ट्राफीक जाम करून थांबविली.
      सदरची दोन्ही वाहने ट्रॅफीक जॅममध्ये आडकल्यानंतर एका ट्रकमधील आरोपी उडी मारून पळून गेले व दुसऱ्या ट्रकमधील आरोपीने ट्रकने संरक्षक कठडा तोडून पळुन जाऊ लागले त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा एका पथकाने थांबलेला एक ट्रक ताब्यात घेतला व पळुन जाणारे दुस-या ट्रकचा पाठलाग सुरू केला त्यातीलही आरोपी ट्रक सोडून शेजारील ऊसात पळून गेले. थांबलेले दोन्ही ट्रक पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या टाटा कंपनीच्या ३११८ मॉडेलच्या दोन ट्रकमधून रांजणगाव एम.आय.डी.सी. येथील आय.टी.सी.कंपनीचा सिगारेट भरलेले ४,५१,५८,४०० रूपये किंमतीचे ५८८ बॉक्स हस्तगत केले आहे. पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेकडून पथके रवाना केली होती. परंतु रात्री अंधार झाल्याने व आरोपीकडे हत्यार असण्याची शक्यता असल्याने आरोपी लपलेल्या भागावर देखरेख ठेवून उजेड झाल्यानंतर पोलीस मित्राचे मदतीने सकाळी ११.०० वाजेपर्यंत एकुण ७ आरोपींना शिताफीने ऊसाचे शेतातून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे १) दिनेश वासुदेव झाला ( वय.५० वर्षे रा. टोक कला, तालुका टोक खुर्द, जि. देवास ) २) सुशील राजेंद्र झाला ( रा. टोककला, ता. टोक खुर्द, जि.देवास ) ३) मनोज केशरसिंग गुडेन ( रा.ओढगाव, ता. सोनकछ, जि. देवास ) ४) मनोज उर्फ गंजा राजाराम सिसोदिया ( रा. भैरव खेडी जि. देवास ) ५) ओमप्रकाश कृष्णा झाला ( रा. भैरव खेडी ता. टोक खुर्द, जि.देवास ) ६) कल्याण सदुल चौहान ( रा ओढ, तालुका सोनकछ, जिल्हा देवास ) ७) सतिश आंतरसिंग झांजा ( रा.ओडगाव, ता.सोनकछ,जिल्हा देवास ) राज्य मध्यप्रदेश अशी आहेत.
        संपुर्ण कारवाईदरम्यान रू.४ कोटी ५१ लाख ५८हजार चारशे रूपये किंमतीचे सिगारेट,१३ हजार सहाशे रोख रक्कम, ६ मोबाईल फोन, २ ट्रक, १ बनावट रिव्हॉल्वर, डुप्लीकेट नंबर प्लेटचे अंक व नंबर, एक चॉपर, एक चाकु असा एकुण ४ कोटी ९१ लाख ७९ हजार ५०० रूपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे.याबाबत अधिक चाैकशी केली असता सिगारेटचा माल हा सुपे ते मोरगाव रोडवरून सिगारेटने भरलेला कंटेनर हायजॅक करून दरोडा टाकून लुटून आणल्याचे सांगितले. सदर घटनेमध्ये आरोपीनी कंटेनर हायजॅक केल्यानंतर कंटेनरमधील ड्रायव्हरला रिव्हॉल्व्हरसारख्या दिसणाऱ्या वस्तुचा धाक दाखवून त्यांचेकडील एका टूकमथून पळवून नेऊन टेंभुर्णी येथे सोडून दिले होते त्याने घडलेल्या घटनेबाबत दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पो.स्टे. येथे गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा तपास स.पो.नि.सोमनाथ लांडे, वडगाव निंबाळकर पो.स्टे.हे करीत आहेत.
     ताब्यात घेतलेले इसम हे आंतरराज्य टोळीतील कुख्यात व सराईत गुन्हेगार असून त्यांनी यापूर्वी पुणे ग्रामीण हद्दीतील शिक्रापूर पो.स्टे.,यवत पो.स्टे. हद्दीत गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे परंतु सदर टोळीतील आरोपी हे कुख्यात व सराईत गुन्हेगार असल्याने प्रत्येकवेळी देशभरातील पोलीसांना चकवा देत होते. त्यांनी संपूर्ण भारत देशात आंध्रप्रदेश, ओडीसा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, हरीयाना, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये गुन्हे केलेले आहेत, त्यांचेकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन त्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथे तपास चालु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
          स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या बातमीस तात्काळ प्रतिसाद देऊन चित्तथरारक पाठलाग करून मोठ्या शिताफीने आरोपींना व लुटून नेलेल्या रू.४,९१,७९,५०० रूपये किंमतीचे मालासह आरोपीसह पकडल्याने या धाडसी कामगिरीचे काैतुक होत आहे..