कोरोना योध्द्यांना काळजी घेण्याचा रोहीत पवारांचा सल्ला

ससुन रुग्णालयाला दिली भेट पुणे : काेराेनाच्या िवराेधात लढणाऱ्यांना लागणारी मदत राज्य सरकार पाेचवित अाहे, तुम्ही काळजी घ्या असा अापुलकीचा सल्ला अामदार राेहीत पवार यांनी ससुन रुग्णालयात काेराेना

ससुन रुग्णालयाला दिली भेट

पुणे :
काेराेनाच्या िवराेधात लढणाऱ्यांना लागणारी मदत राज्य सरकार पाेचवित अाहे, तुम्ही काळजी घ्या असा अापुलकीचा सल्ला अामदार राेहीत पवार यांनी ससुन रुग्णालयात काेराेना िवभागात काम करणाऱ्यांना िदला.



       कोरोनामुळे पुणे आणि मुंबईतील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनस्तरावर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.याच पार्श्वभूमीवर (दि.२७) रोजी राष्ट्रवादीचे नेते अािण कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे येथील ससुन हॉस्पिटलला भेट िदली. येथील रुग्णांशी संवाद साधला.यावेळी पवारांना अतिदक्षता विभागास आवर्जुन भेट िदली. तेथील गंभीर रुग्ण अािण कोरोनाशी लढा देत असताना संक्रमित झालेल्या डॉक्टर,नर्स,सुरक्षारक्षक आदींची भेट घेतली. ‘काळजी घ्या’ असा आपुलकीचा सल्ला दिला.यावेळी कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेटून त्यांच्या असणाऱ्या अडचणी व तेथील परिस्थितीही जाणून घेतली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्याबरोबरच पुणे येथील हॉस्पिटलवरही बारकाईने लक्ष आहे.कोरोना वॉरीयर्सना लागणारी मदतही ते पोहोचवत आहेत, असे पवार यांनी सांगितले.

      दरम्यान मानदेशी फाऊंडेशनच्या वतीने ससून हॉस्पिटलसाठी पी.पी.ई.किट, गॉगल व एन-९५ मास्क पवार यांचेकडे देण्यात आले होते.हे सर्व साहित्य ससुन हॉस्पिटलचे अधिष्ठाता  डॉ.मुरलीधर तांबे यांच्याकडे सुपूर्द केले.  यावेळी डॉ.योगेश गवळी, डॉ.हरीश ताटीया, डॉ.मुरलीधर बिरादार व इतर डॉक्टर,नर्स व कर्मचारी उपस्थित होते.