रोहित पवारांनी महाराष्ट्रातील तरुणांना पुन्हा एकदा केले आवाहन

पुणे - कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामध्ये लाखो परप्रांतीय आपल्या राज्यात रवाना झाले होते. मात्र लॉकडाऊन ५ मध्ये अटी शिथिल केल्यामुळे रोज हजारे परप्रांतीय पुन्हा

 पुणे – कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामध्ये लाखो परप्रांतीय आपल्या राज्यात रवाना झाले होते. मात्र लॉकडाऊन ५ मध्ये अटी शिथिल केल्यामुळे रोज हजारे परप्रांतीय पुन्हा राज्यात परतत आहेत. अशाने महाराष्ट्रातील तरुणांकडे आलेली संधी ते गमावण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी सर्व तरुणांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे. तरुणांनी जास्तीत जास्त संधीचा फायदा घ्यावा आणि पुन्हा एकदा विचार करुन कामावर रुजू व्हावे. असे आवाहन रोहित पवारांनी ट्विट करत केले आहे. 

ट्विटच्या माध्यमातून रोहित पवार म्हणाले की, पुण्यासारख्या शहरात रोज १७ हजारांपेक्षाही अधिक स्थलांतरित मजूर परतत आहेत.त्यामुळं येत्या काही दिवसात आपली हक्काची कामं जाऊ शकतात. त्यामुळं मराठी युवांनी तातडीने कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार करावा. अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला,पण अजून देण्याची गरज आहे.कोणतंही काम लहान-मोठं नसतं.

लॉकडाऊन-५ मध्ये सरकारने शिथिलता दिल्याने १५ ते २० हजारांहून परप्रांतीय पुन्हा राज्यात परतले आहेत. रोज २००० हजार कामगार परतत आहेत. पुण्या-मुंबईतील उपस्थित असलेल्या कामांवर तरुणांनी लवकरात लवकर रुजू होण्याचे आवाहन रोहित पवारांनी केले आहे.