पुण्याच्या स्टार्टअपकडून Rompus+ ई-सायकल लाँच ; ५० रुपयांत १०००किमी धावणार

ई-सायकलची किंमत ४२,३१७ रुपये असून ती कोरोना संकट यायच्या काही दिवस आधी लाँच करण्यात आली होती. ही सायकल तीन चे ४ तासांत फूल चार्ज होते. तसेच एका चार्जमध्ये ८० किमीची रेंज देते. थ्रोटल मोडवर ६५ आणि पेडल मोडवर ५५ किमी ही सायकल धावू शकते.

    पिझ्झा डिलिव्हरीसाठी एका उद्योजकाच्या कंपनीला पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर परवडत नव्हत्या म्हणून त्या उद्योजकाने ईव्ही सायकलवर संशोधन सुरु केले. यासाठी त्याने स्वत:ची स्टार्टअप कंपनी सुरु केली. आज या शोधाला मोठे यश मिळाले असून फक्त ५० रुपयांत १००० किमीच्या रेंजच्या ई सायकल बनविल्या आहेत.  पुण्यातील स्टार्टअप नेक्सझू मोबिलिटीने दोन नवीन इलेक्ट्रीक सायकल बाजारात आणल्या आहेत. Rompus+ आणि Roadlark या दोन विजेवर चालणाऱ्या ई सायकल आहेत. भारतातील मोठी पिझ्झा कंपनी असलेल्या पापा जॉन्स पिझ्झाचे गुंतवणूकदार असलेल्या अतुल्य मित्तल यांच्या कंपनीने ही सायकल बनविली आहे. त्यांनी त्यांच्या गरजेसाठी अवान मोटर्सनावाची कंपनी स्थापन केली होती. त्याची नेक्सझू मोबिलिटी ही स्टार्टअप कंपनी आहे.

    Rompus+ई-सायकलची किंमत ३१, ९८३ रुपये आहे. महत्वाचे म्हणजे ही सायकल फोनसारखी चार्ज करता येणार आहे. यामध्ये २५०W ३६V BLDC मोटर देण्यात आली असून ५. २ Ah lithium-ion battery देण्यात आली आहे. ही बॅटरी अडीच ते तीन तासांत फूल चार्ज होते. तसेच या बॅटरीची लाईफ सायकल ही ७५०चार्जची आहे. या Rompus+ चा वेग हा २५ mph असून १८ महिन्यांची वॉरंटी देण्यात आली आहे. या साकलची रेंज ही २२ किमी थ्रोटल मोडवर आणि ३५ किमी इको पेडल मोडवर असणार आहे. Roadlark या ई-सायकलची किंमत ४२,३१७ रुपये असून ती कोरोना संकट यायच्या काही दिवस आधी लाँच करण्यात आली होती. ही सायकल तीन चे ४ तासांत फूल चार्ज होते. तसेच एका चार्जमध्ये ८० किमीची रेंज देते. थ्रोटल मोडवर ६५ आणि पेडल मोडवर ५५ किमी ही सायकल धावू शकते. ग्रे आणि ब्लॅक अशा रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. ही ई सायकल Nexzu Mobility च्या कोणत्याही डिलरशीपकडे किंवा कंपनीच्या वेबसाईटवर बुक करता येणार आहे. याशिवाय लवकरच पेटीएम मॉल आणि अॅमेझॉनवरही उपलब्ध केली जाणार आहे.