५१ अपंगांना ५ टक्के निधीतून प्रत्येकी १ हजार रुपये ; कवठे येमाई ग्रामपंचायतीचा अपंगांना दिलासा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कवठे येमाई ग्रामपंचायतीचा अपंगांना दिलासा कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई ग्रामपंचायतीच्या वतीने अपंगांसाठीच्या ५ टक्के निधीतून ५१ जणांना प्रत्येकी १

कवठे येमाई  : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई ग्रामपंचायतीच्या वतीने अपंगांसाठीच्या ५ टक्के निधीतून ५१ जणांना प्रत्येकी १ हजार रुपये आज चेकच्या स्वरूपात देण्यात देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध अडचणींचा सामना करीत असलेल्या येथील अपंगांना आर्थिक मदत झाल्याने त्यांनी सरपंच अरुण मुंजाळ व ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहेत. 

       या प्रसंगी शिरूर पंचायत समितीचे सदस्य डॉ.सुभाष पोकळे,सरपंच अरुण मुंजाळ, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड,सागर रोहिले,स्वप्नील घोडे,सुशील ढोरके,ग्रामपंचायत कर्मचारी वसंत सावंत,बबन शिंदे व अनेक अपंग बांधव उपस्थित होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदत झाल्याने उपस्थित अपंगांनी समाधान व्यक्त केले आहे. 

   दरम्यान आगामी पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामपंचायतीच्या वतीने वाड्यावस्त्यांवर आरोग्याबाबत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहान करण्यात येत असून नागरिकांना मेडीक्लोअर औषधांचे वाटप करण्यात येत आहे. तर कवठे गावठाणात तण व जंतुनाशक फवारणी देखील सुरु करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांनी सांगितले.