वेदिकासाठी अवघ्या ७७ दिवसात जमा झाले १६ कोटी रुपये ; केंद्र आणि राज्य सरकारने केले लसीवरील आयात शुल्क माफ

वेदिकाचे वडील सौरभ शिंदे आणि आई स्नेहा शिंदे म्हणाले, हजारो नागरिकांची मदत आणि शुभेच्छांच्या बळावर अकरा महिन्यांची चिमुकली वेदिका दुर्धर आजारावर मात करणार आहे.सर्वांच्या आर्थिक मदतीमुळे आणि सदिच्छेमुळे माझ्या चिमुकलीला जीवदान मिळणार आहे.

    पिंपरी :  दुर्धर आजाराच्या विळख्यात अडकलेल्या भोसरीतील वेदिका शिंदे या अवघ्या ११ महिन्यांच्या चिमुरडीवर आता वैद्यकीय उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. लसीसाठी आवश्यक १६ कोटी रुपयांच्या निधी संकलनाचे कठीण कार्य हजारो नागरिकांच्या दातृत्त्वामुळे पुर्ण झाले असून केंद्र आणि राज्य सरकारनेही लसीवरील आयात शुल्क माफ केले आहे.

    अवघ्या आठ महिन्यांची असताना वेदिकाला ‘एसएमए – टाईप वन’ या दुर्धर आजाराचे निदान झाले. त्यामुळे वेदिकाच्या आई वडिलांच्या पाया खालची जमीनच सरकली. या आजारासाठी देण्यात येणाNया लसीची किंमत सुमारे १६ कोटी रुपये आहे. अमेरिकेहून आयात होणाNया या लसीचे आयात शुल्कही भरमसाठ आहे. तथापि, ही लस देण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले. एवढी मोठी रक्कम कुठून आणणार असा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला. समाजाच्या विविध घटकांना आर्थिक मदत करण्याचे पालकांनी ठरविले. १६ कोटी रुपये जमा करण्याचा खडतर आणि अवघड प्रवास अडिच महिन्यांपुर्वी सुरु झाला.

    वेदिकाच्या पालकांनी आर्थिक मदतीचे आवाहन करताच समाजाच्या प्रत्येक स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला. वेदिका अकरा महिन्यांची होण्यापूर्वीच दात्यांमुळे तब्बल १६ कोटी रुपये जमा झाले. यानंतर तिच्या पालकांनी केंद्र आणि राज्य सरकारने आयात शुल्क माफीची विनंती केली. ही विनंतीही वेंâद्र आणि राज्य सरकारने मान्य केल्याने अमेरिकेहून लस येण्याचा मार्ग ख्ुाला झाला आहे. लस आल्यानंतर वेदिकावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जातील.

    वेदिकाचे वडील सौरभ शिंदे आणि आई स्नेहा शिंदे म्हणाले, हजारो नागरिकांची मदत आणि शुभेच्छांच्या बळावर अकरा महिन्यांची चिमुकली वेदिका दुर्धर आजारावर मात करणार आहे.सर्वांच्या आर्थिक मदतीमुळे आणि सदिच्छेमुळे माझ्या चिमुकलीला जीवदान मिळणार आहे. या कामी मराठी अभिनेता निलेश दिवेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. लसीकरणानंतर वेदिका पूर्णपणे ठणठणीत बरी होऊन तिचा पहिला वाढदिवस साजरा करू.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने अमेरिकेतील लसनिर्मिती कंपनीकडे लसीची मागणी नोंदविण्यात आली आहे. येत्या दहा – बारा दिवसांत ही लस रुग्णालयात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वेदिकाला ही लस दिली जाईल. खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी हा विषय दिल्ली पातळीवर संसद भवनमध्ये अतिशय तळमळीने मांडला व तितक्याच ताकदीने शक्य तितकी मदत करून प्रयत्न पणाला लावले. तसेच माजी आमदार विलास लांडे यांनी देखील लाखमोलाची मदत केल्याचे शिंदे आवर्जून सांगतात.