fraud

आरोपी महिलेने फिर्यादी थोरवे यांना हॉटेल भाड्याने देण्याचे सांगितले. त्यासाठी डिपॉझिट आणि अ‍ॅडव्हान्स म्हणून आरोपीने साडेसहा लाख रूपये घेतले. हॉटेल भाड्याने न देता तरूणाची फसवणूक केली. फौजदार मोरे तपास करत आहेत.

    पिंपरी : एका महिलेने हॉटेल भाड्याने देते, असे सांगून डिपॉझिट आणि अ‍ॅडव्हान्स म्हणून पैसे घेत हॉटेल भाड्याने न देता तरूणाची साडेसहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार वाल्हेकरवाडी येथे घडला.

    सरोज आनंद गुजर (वय ३९, रा. प्रगती दर्शन हौसिंग सोसायटी, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. संकेत बाळासाहेब थोरवे (वय २९, रा. सहयोगनगर, रूपीनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी महिलेने फिर्यादी थोरवे यांना हॉटेल भाड्याने देण्याचे सांगितले. त्यासाठी डिपॉझिट आणि अ‍ॅडव्हान्स म्हणून आरोपीने साडेसहा लाख रूपये घेतले. हॉटेल भाड्याने न देता तरूणाची फसवणूक केली. फौजदार मोरे तपास करत आहेत.