पुणे-नाशिक महामार्गच्या विकासासाठी ६५० कोटी रूपयांची मंजूरी

पिंपरी : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने पुणे आणि नाशिक या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या पुणे-नाशिक महामार्ग क्र.६० च्या विकासासाठी महत्वाची घोषणा केली आहे.

शिरुर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांची माहिती

पिंपरी : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाने पुणे आणि नाशिक या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या पुणे-नाशिक महामार्ग क्र.६० च्या विकासासाठी महत्वाची घोषणा केली आहे. नाशिक फाटा ते चांडोली या सेक्शनमधील मोशी (इंद्रायणीनगर) ते चांडोली या १८ किमी लांबीच्या सहापदरी रस्त्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरुर लोकसभा मतदार संघातील खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.

पुणे-नाशिक महामार्गच्या विकासासाठी ६५० कोटी रूपयांची मंजूरी मिळाली असून खासदार डॉ कोल्हे यांनी केंद्रीय अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभारही मानले आहेत. तब्बल ६५० कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाल्यामुळे यामार्गावर चाकण जंक्शन येथे एक उड्डाणपूल देखील प्रस्तावित आहे. हा रस्ता तयार झाल्यानंतर या मार्गावरील प्रवास आणखी सोपा होईल, असा विश्वास डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.

मंजूरी मिळालेल्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

● ६५० कोटींचा निधी मंजूर

● मोशी ते खेड १७.७७ किमीचा प्रशस्त सहापदरी मार्ग मंजूर

● यामध्ये ७ अंडर पास , २ ओव्हर पास आणि २ एलिव्हेटेड पूल समाविष्ट

● चाकण चौक येथे २.२५० किमीचा उड्डाणपुल

● या प्रकल्पामुळे चाकण जंक्शन येथील वाहतुक कोंडीची समस्या कायमस्वरूपी दूर होणार

● परिसरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार

● लगतच्या एमआयडीसी परिसरातील वाहतुक सुरळीत होण्यास मदत