महावितरण कार्यालया समोर रासपचे ठिय्या आंदोलन ; वीज तोड मोहिम थांबवा , अन्यथा तीव्र आंदोलन

गेल्या आठवड्यात महावितरणच्या कार्यालयात उपकार्यकारी अभियंता यांना वीज बील न भरणा-या शेतक-यांचे वीज तोडणीची कारवाई थांबविण्याची रासपच्या पदाधिका-यांनी केली होती. याबाबत चे लेखी निवेदन देण्यात आले होते .मात्र या निवेदनाची दखल न घेता वीज कनेक्शन तोडण्याचा व डीपी सोडवण्याची मोहिम महावितरणने सुरू केली.

    बारामती : राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुक्याच्या वतीने उपकार्यकारी अभियंता महावितरण कंपनी बारामती ग्रामीण च्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले .महावितरणने थकीत वीज बीलांसाठी सुरु केलेली वीज तोड मोहिम थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

    गेल्या आठवड्यात महावितरणच्या कार्यालयात उपकार्यकारी अभियंता यांना वीज बील न भरणा-या शेतक-यांचे वीज तोडणीची कारवाई थांबविण्याची रासपच्या पदाधिका-यांनी केली होती. याबाबत चे लेखी निवेदन देण्यात आले होते .मात्र या निवेदनाची दखल न घेता वीज कनेक्शन तोडण्याचा व डीपी सोडवण्याची मोहिम महावितरणने सुरू केली. या पार्श्वभूमीवर रासपच्या वतीने हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आमचे एवढेच म्हणणे आहे की, शेतकऱ्यांची शेतातील हाता तोंडाशी आलेली पीके आपल्या वीज कनेक्शन तोडण्याने पाणी देणे अवघड झालेले आहे, त्यांची पीके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत . अगोदर कोरोनाच्या महामारीत शेतकरी पुर्णपणे मोडखळीस आलेला आहे ,आणि त्यात महावितरण अशा पध्दतीने काम करत आहे, लवकरात लवकर आपण विज कनेक्शन तोडणी थांबवावी व डीपी सोडवीणे बंद करावे, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष संपुर्ण महाराष्ट्र उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल ,असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता यानी आंदोलनास भेट देऊन तुमच्या मागण्या सरकार दरबारी पोहचवू, अश्वासन दिले. यावेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संदिप चोपडे,तालुकाध्यक्ष अॅड.अमोल सातकर ,जिल्हा प्रभारी किरण गोफणे, सतीश शिंगाडे,किसन हंडाळ,लखण कोळेकर, शैलेश थोरात,विठ्ठल देवकाते, महादेव कोकरे,काकासाहेब बुरूंगले,चंद्रकांत वाघमोडे,तानाजी मारकड, कमलेश हिरवे, किशोर सातकर,निखील दांगडे तुषार गुलदगड, अण्णा पांढरे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.