माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटेची पत्नीला गुन्हे शाखेकडून अटक

बऱ्हाटेने केलेल्या गुन्हयांमध्ये त्याच्या कुटूंबातील कोणाचा सहभाग आहे का? हे पडताळले जात होते. दरम्यान तपासात त्याच्या पत्नीचाही कटामध्ये सहभाग असल्याचे प्राथमिकदर्शी दिसत होते. यामुळे बुधवारी दुपारी तिला ताब्यात घेण्यात आले. यानंतर चौकशी करुन अटक करण्यात आले.

    पुणे: शहरात खंडणी, फसवणूक आणि जमिन बळकावण्याच्या तब्बल १२ गुन्हयांमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता व मोक्काचा आरोप असलेला फरार आरोपी रविंद्र बऱ्हाटेची पत्नी संगीता रविंद्र बऱ्हाटेला (५५) गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पत्नीची कसून चौकशी करण्यात येत असून तिचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे सिध्द झाले आहे.

    बऱ्हाटेसह तथाकथीत पत्रकार देवेद्र जैनही फरार आहे. बऱ्हाटे व जैन टोळीवर तब्बल बारा गुन्हे दाखल आहेत. यातील तीन गुन्हयात बऱ्हाटेला मोक्का लागला आहे. त्यांच्या टोळमध्ये सांगलीचे संजय भोकरे, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांचाही समावेश आहे. मागील वर्षभरापासून बऱ्हाटे हा पोलिसांना गुंगारा देत आहे. मागील काही दिवसांपुर्वी त्याने फेसबुकवर दोन वेळा लाईव्ह करुन पोलिसांवर आरोपी केले होते. हे लाईव्ह करण्यास मदत करणाऱ्यासही ताब्यात घेण्यात आले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,बऱ्हाटेने केलेल्या गुन्हयांमध्ये त्याच्या कुटूंबातील कोणाचा सहभाग आहे का? हे पडताळले जात होते. दरम्यान तपासात त्याच्या पत्नीचाही कटामध्ये सहभाग असल्याचे प्राथमिकदर्शी दिसत होते. यामुळे बुधवारी दुपारी तिला ताब्यात घेण्यात आले. यानंतर चौकशी करुन अटक करण्यात आले.