माहिती अधिकार कार्यकर्ते यांना पिस्तुलधारी पोलिसांचे संरक्षण

वाघोली: बकोरी (ता.हवेली) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती सेवा समितीच्या माध्यमातून राज्यभर भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम करणारे चंद्रकांत वारघडे यांना पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने दोन शस्त्रधारी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे.वारघडे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून  राज्यभरात अनेक संवेदनशील प्रकरणे हाताळले आहेत. तर पुणे जिल्ह्यात देखील माहिती सेवा समितीच्या माध्यमातून त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनचे आणि वृक्षारोपणाची जोरदार काम सुरू केले आहेत.यामुळे काही भ्रष्टाचार करणारे अधिकारी,स्वामिल धारक, अवैद्य व्यवसाय करणारे दु:खवले गेले आहेत यामुळे याच रोषातून काही दिवसापूर्वी चंद्रकांत वारघडे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक देखील करण्यात आली होती तर काही लोकांकडून त्यांना धमक्या देखील आल्याचे प्रकार समोर आले होते.यामुळे त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे जीवितास धोका असल्याने संरक्षण देण्याची मागणी केली होती याची दखल घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी  चंद्रकांत वारघडे यांच्या मागणीनुसार यांना दोन शस्त्रधारी पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहेत अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांनी दिली. यामुळे राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्याकडून पुणे पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले आहे