पुण्यातील आरटीओ कार्यालय अडीच महिन्यानंतर सुरू

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील तीन महिन्यांपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तसेच विविध प्रकारचे कारखाने, सरकारी आणि खाजगी कार्यालये सुद्धा बंद करण्यात आले

 पुणे :  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील तीन महिन्यांपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तसेच विविध प्रकारचे कारखाने, सरकारी आणि खाजगी कार्यालये सुद्धा बंद करण्यात आले होते. परंतु आता पुण्यातील लॉकडाऊनमुळे बंद असलेले आरटीओ अवघ्या अडीच महिन्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे १९ जून रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियमित कामकाज आजपासून सुरू होणार आहेत. परंतु प्रत्येक कामासाठी कार्यालयामध्ये अपॉइमेंट घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कार्यालयातील गर्दी कमी होईल आणि कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो. त्यामुळे आरटीओ कार्यालयातून असा महत्त्वाचा निर्णय़ घेण्यात आला आहे.   

परिवहन आयुक्त कार्यानयायने राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयीन परवाना, योग्यता प्रमाणपत्र आणि विविध नियमित कामकाज सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच परिवहन कार्यालयातील परवाना कोटाही जवळपास ८० ते ८५ टक्के  कमी करण्यात आला आहे.. दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन आता हळूहळू शीथील करण्यात येत आहे. त्यासोबत छोटे-मोठे उद्योग, व्यवसायही तसेच दुकानं आणि सार्वजनिक वाहतूकही सुरु करण्यात आली आहे.