‘रूबी’ला महिन्यासाठी ४७ लाख देणार; महापालिकेचा निर्णय

पिंपरी - चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव प्रचंड वाढू लागल्याने महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील रूबी अल केअर हे २७ खाटांचे आयसीयू हदयरोग युनिट तेथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचा सह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यासमेवत आणखी एक महिना वाढीव कालावधीचा करारनामा करण्यात आला आहे. त्यानुसार, एक महिन्यांसाठी ४७ लाख ३६ हजार रूपये खर्च होणार आहे.

    पिंपरी : पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव प्रचंड वाढू लागल्याने महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयातील रूबी अल केअर हे २७ खाटांचे आयसीयू हदयरोग युनिट तेथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचा सह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यासमेवत आणखी एक महिना वाढीव कालावधीचा करारनामा करण्यात आला आहे. त्यानुसार, एक महिन्यांसाठी ४७ लाख ३६ हजार रूपये खर्च होणार आहे.

    पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने मार्च २०२० मध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालय हे कोविड हॉस्पीटल म्हणून निश्चित केले. या रूग्णालयात केवळ कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार करण्यात येत होते. याच रूग्णालयात रूबी अल केअर सव्र्हीसेस हे २७ खाटांचे आयसीयू हदयरोग युनिट कार्यरत आहे. कोरोनाच्या कामकाजासाठी हे युनिट १ एप्रिल २०२० पासून तेथील कार्यरत सर्व डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे या युनिटमध्येही कोरोना बाधीत रूग्ण दाखल होत आहेत. तेथील ३० प्रोफेशनल वैद्यकीय अधिकारी आणि २२८ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनाकरिता महापालिकेमार्फत ४७ लाख ३६ हजार रूपये प्रति महिना रूबी अल केअर यांना देण्याबाबत त्यांच्यासमवेत करारनामा करण्यात आला आहे.

    कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने हे रूग्णालय पुन्हा रूबी अल केअरतर्फे चालविण्यात येऊ लागले होते. मात्र, शहरात पेâब्रुवारी महिन्यात पुन्हा कोरोनाचा प्रादूर्भाव प्रचंड वाढत चालल्याने रूबी अल केअर रूग्णालय २९ मार्च ते २७ मे २०२१ या कालावधीकरिता अधिग्रहित करण्यात आले. त्याची मुदत २८ मे रोजी संपली आहे. त्यामुळे २८ मे ते २६ जून २०२१ या वाढीव कालावधीचा करारनामा करण्यात येणार आहे. प्रति बेड प्रति दिन ५ हजार ८४७ रूपये यानुसार, ३० प्रोपेâशनल वैद्यकीय अधिकारी आणि २२८ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतनाकरिता एक महिने कालावधीकरिता ४७ लाख ३६ हजार रूपये प्रति महिना खर्च होणार आहे.

    हे सुद्धा वाचा