म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनसाठी धावपळ ; दररोज १२०० इंजेक्शनची गरज मात्र मिळ‌तात १००

 शहरातील २५ खासगी ररुग्णांमध्ये सुमारे १५७ रुग्णांची नोंद

  पुणे : म्युकरमायकोसिस या आजारावर शहरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या विचारात घेतली, तर शहराला दररोज १२०० इंजेक्शनची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र शंभर इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल अद्यापही संपले नाहीत.

  कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांमध्ये या दुर्मिळ आजाराचे लक्षण दिसून आली आहे. दिवसागणिक या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शहरातील २५ खासगी ररुग्णांमध्ये सुमारे १५७ रुग्णांची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. तर सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्या यापेक्षा वेगळी आहे.

  याचा विचार करता रुग्णालयांकडून सध्या दररोज १२०० इंजेक्शनची मागणी आहेत. प्रत्यक्षात मात्र शंभरच इंजेक्शन जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. रुग्णालयांनी नोंदणी केल्यानुसार प्रत्येक रुग्णालयांना कमी जास्त प्रमाणात ते उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे बुधवारी देखील शहरात या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत झाला नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

  लसीकरणासाठी ‘अब तक ८४’परगावाहून नागरिक पुण्यात
  या आजारावर पोस्केनॉझॉल, ॲम्पोटेसीन-बी या इंजेक्शन उपयोगी पडते. रुग्णाच्या वजन विचारात घेऊन या इंजेक्शनचा डोस ठरविला जातो. त्यानुसार काही रुग्णांना पाच तर काही रुग्णांना दररोज १० ते १२ इंजेक्शनचा डोस द्यावा लागत आहे. इंजेक्शनचा डोस कमी पडला अथवा एक दिवस उशीर झाला, तरी रुग्ण गंभीर स्थितीत जाऊ शकतो. परंतु सध्या तुटवडा असल्याने रुग्णांना आवश्‍यक तेवढे इंजेक्शन उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना भरावे लागत आहे. शहराबरोबरच परगावाहून अनेक जण या इंजेक्शन मिळविण्यासाठी पुण्यात येत असल्याचे चित्र आहे.