सचिन वाझेंना अटक, शरद पवारांचा बोलण्यास नकार, शंकेला वाव

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहन तपास प्रकरणामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना सचिन वाझे यांच्या अटकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा शरद पवार यांनी यावर फार बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला.

    बारामती : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण स्थानिक असून मी त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, असं वक्तव्य पवारांनी केलं आहे. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहन तपास प्रकरणामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना सचिन वाझे यांच्या अटकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा शरद पवार यांनी यावर फार बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला.

    गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे आणि एकंदरच याप्रकरणाच्या हाताळणीवरुन त्यांनी नापसंती दर्शविली होती. घटनेनुसार राज्यसरकारने केलेल्या शिफारशींना मान्यता देणे ही राज्यपालांची जबाबदारी असते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीची आणि घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला, ही दुर्दैवी गोष्ट आहे, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार (Shrarad pawar ) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.