वित्तहानी टाळण्यासाठी वृक्षांचा बळी

महापालिका आंबील ओढ्या लगतची २५० झाडे तोडणार पुणे : पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थितीत होणारी जीवितहानी टाळण्यासाठी अंबिल ओढाच्या 10 कि.मी. अंतरावर 250 झाडे तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला

महापालिका आंबील ओढ्या लगतची २५० झाडे तोडणार

पुणे  :
पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थितीत होणारी जीवितहानी टाळण्यासाठी अंबिल ओढाच्या 10 कि.मी. अंतरावर 250 झाडे तोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. शिवाय पावसाळाही लांबला होता. त्यातच २५ सप्टेंबरला ढगफुटी झाल्याने आंबिल ओढ्याला पूर येऊन जीवित हानीसह कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. कात्रज भागात उगम पावलेल्या आणि वैकुंठ स्मशानभूमीजवळ मुठा नदीला मिळणाऱ्या अंबिल ओढ्याच्या पुराने २० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अंबिल ओढा स्वच्छ करण्यासाठी रुंदीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले आहे.

पालिकेने शहरातील सर्व नाल्यांचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये आंबील ओढ्याची रुंदी १८ मीटर असणे आवश्यक असताना प्रत्येक्षात मात्र अनेक ठिकाणी ओढ्याची रुंदी ९ मीटर असल्याचे समोर आले आहे. बहुतेक ठिकाणी झाडांमुळे नाल्याची रुंदी कमी झाली आहे. जी  झाडे नैसर्गिक प्रवाहामध्ये अडथळे निर्माण करत आहेत. अशी आंबील ओढ्या लागतची २५० झाडे  पावसाळ्यापूर्वी ती काढून टाकणे आवश्यक आहे. गेल्या वर्षीच्या पुरात ओढाच्या बाजूची बहुतेक झाडे उन्मळून पडली होती.  ज्यामुळे पुराचे पाणी वाहण्यास अडथळा निर्माण झाला  आणि निवासी भाग पाणी खुसले होते. त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ठरणारी झाडे तोडण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी घेतली असून नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलच्या निर्देशानुसार या वृक्षांबाबत नागरिकांच्या सूचना व हरकतीं सूचना मागवण्यात आल्या आहेत. या सूचना व हरकतीं सूचना कालावधी संपल्यानंतर झाडे तोडू नाल्याची रुंदी वाढवण्यात येईल अशी माहिती मुख्य अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी दिली.

-ओढ्यांमधील राडारोडा काढण्याचे ८० टक्के काम पूर्ण  

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील आंबिल ओढ्यासह विविध ओढ्यांमधील राडारोडा काढण्याचे आणि ओढ्यांवरील कल्वर्ट दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून ते ८० टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. हे काम मे महिन्याअखेर सर्व काम पूर्ण होईल ते पलिक प्रशासनकडून सांगण्यात आले आहे.