सदानंद शेट्टी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘शरद पवार , अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहोत. पुणे शहराचा विकास कणखर नेतृत्व आणि दूरदृष्टी असलेले अजितदादाच करू शकतात, यावर आमचा ठाम विश्वास आहे. यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही निष्ठेने पार पाडू,’ अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी पक्षप्रवेशानंतर दिली.

    पुणे : पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे व सदानंद शेट्टी यांच्यासह वानवडी भागातील प्रफुल्ल जांभुळकर व केव्हिन मॅन्युअल यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांची उपस्थिती होती.

    ‘शरद पवार , अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहोत. पुणे शहराचा विकास कणखर नेतृत्व आणि दूरदृष्टी असलेले अजितदादाच करू शकतात, यावर आमचा ठाम विश्वास आहे. यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही निष्ठेने पार पाडू,’ अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी पक्षप्रवेशानंतर दिली. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून, या पक्षप्रवेशाने निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.