व्यवसाय प्रशिक्षण शिक्षकांचे वेतन रखडले

कोविड-१९ या विषाणूंचा विळखा घट्ट होत असल्याने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. लाॅकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले असून अनेक संस्था, कारखाने बंद पडले आहेत.तर शाळा, महाविद्यालये देखील बंद

– व्यवसाय प्रशिक्षणावर संकटाचे सावट

कोविड-१९ या विषाणूंचा विळखा घट्ट होत असल्याने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. लाॅकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले असून अनेक संस्था, कारखाने बंद पडले आहेत.तर शाळा, महाविद्यालये देखील बंद आहेत.ते कधी चालू होतील याची  शाश्वती नाही. यामुळे शासनाच्यावतीने खासगी कंपन्यांमार्फत  अनेक महानगरपालिका शाळेत, जि. प. शाळेत, आश्रमशाळेत स्किल इंडिया अतंर्गत विविध कौशल्य विकासाचे/ व्यवसाय प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे. सदर अभ्याक्रमाचे अध्यायन गेल्या ४ वर्षांपासून सर्व शाळांत व्यवसाय प्रशिक्षकांच्या माध्यमातून उत्तम रित्या सुरू आहे.परंतु कंपनीने पगार थकविल्याने सर्व व्यावसाय शिक्षकांवर पगाराविना उपासमारीची वेळ आली आहे.

            शासन अशा वर्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे,  संपुर्ण महाराष्ट्रात व्यवसाय शिक्षकांची परिस्थिती फारच बिकट झाली आहे. त्यांना वेळेवर मानधन दिले जात नाही आणि एप्रिल महिन्यापासूनच वेतन अदा न करण्याचा काही कंपनी दावा केला आहे.भ्रणनध्वनी,ईमेल व व्हॉटसअपच्या साहाय्याने शिक्षकांना एक मेसेज पाठवून आपला करार संपला असुन वेतन दिले  जाणार नाही व आपला करार रद्द झाला असून तुम्ही दुसरी नोकरी शोधा असे सांगण्यात आले आहे. यामुळे व्यवसाय शिक्षकांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

            तुटपुंज्या मानधनावर काम करणारे व्यवसाय शिक्षक अशा या बिकट परिस्थिती सापडले आहे. सदर व्यवसाय शिक्षकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह नोकरीवरच  अवलंबून असून त्यांचे वेतन देण्यास कंपनीने नकार दिलेला आहे.पुढील काळात शिक्षकांना उदरनिर्वाहासाठी साधन उरले नसल्याने उपजीविका कशी करायची हा मोठा प्रश्न राज्यातीतील हजारो व्यवसाय शिक्षकांच्या समोर उभा ठाकला आहे.तर कंपनीच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शिक्षकांची पिळवणूक होत आहे.

            राज्य शासनाने याबाबत काहीतरी भूमिका घेऊन शिक्षकांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.तसे न झाल्यास राज्यातील हजारो व्यवसाय शिक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. याबाबत शासन स्तरावरून काहीतरी मार्ग निघणे आवश्यक आहे. अशा बिकट परिस्थितीत शासनाने लक्ष न दिल्यास पुणे जिल्ह्यातील व्यवसाय शिक्षक शासनाकडे दाद मागण्याच्या तयारीत असून सर्व व्यवसाय शिक्षकांचे मानधन त्वरीत देण्याचे आदेश संबधीत कंपन्यांना शासनाकडून व्हावेत,  अशी मागणी पूणे जिल्ह्यातील व्यवसाय प्रशिक्षण शिक्षकांनी शासनाकडे केली आहे.