किल्ले पुरंदरवर संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

जेजुरी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा साधेपणात साजरा करण्यात आली.

दरवर्षी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती त्यांचे जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले पुरंदरवर मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.पाळणा,छबिना,पालखी सोहळा,मर्दानी खेळ,चित्त थरारक कसरती,शिवकाली शस्त्रांचे प्रदर्शन,पोवाडे,व्याखाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करून अत्यंत साधे पद्धतीने संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी सांगितले. आज सकाळी किल्ले पुरंदर वर जावून कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी अजयसिंह सावंत,सागर जगताप,संतोष हगवणे,आनंद जंगम,गौरव जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.