आंबेगाव तहसिल कार्यालयातून जप्त केलेला वाळूचा ट्रॅक्टर चोरीला

भिमाशंकर : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथिल तहसिल कार्यालय येथे आवारामध्ये विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर टॉलीसह जप्त करण्यात आला होता. परंतु दि. ३० रोजी रात्रीच्या सुमारास हा ट्रॅक्टर

भिमाशंकर :  घोडेगाव (ता. आंबेगाव) येथिल तहसिल कार्यालय येथे आवारामध्ये विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर टॉलीसह जप्त करण्यात आला होता. परंतु दि. ३० रोजी रात्रीच्या सुमारास हा ट्रॅक्टर चोरीला गेला असल्याची तक्रार तहसिल कर्मचारी रोहिदास सुपे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.   

पिंपळगाव घोडे येथे विनापरवाना निळया रंगाचा पावर ट्रंक कंपनीचा ट्रॅक्टर टालीसह वाळू वाहतूक करत असताना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गौनखनिज वाहतूकबाबत कोणताही वरिष्ठांचा आदेश नसल्याने आंबेगाव तहसिल कार्यालयाच्या आवारात उभा करून जप्त करण्यात आला. परंतु दि. ३० रोजी रात्रीच्या सुमारास किरण गुलाबराव पोखरकर व अमित विश्वनाथ लोहकरे (दोघे रा. पोखरकरवाडी) यांनी ५ लाख किमतीचा ट्रॅक्टर टॉलीसह व ७ हजार ८५० रूपयांची दिड ब्रास वाळू अशी एकुणे ५ लाख ७ हजार ८५० रूपये किंमतीच्या वस्तू संबंधित व्यक्तिंनी स्वतःच्या फायदयाकरीता मुद्दाम लबाडीच्या इरादयाने तहसिल कार्यालयाच्या आवारातून चोरीला नेल्याचे तहसिल कर्मचारी रोहिदास सुपे यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. 
पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार शंकर तळपे, संदिप लांडे, दिलीप वाघोले करत आहे.
        आंबेगाव तहसिल कार्यालयाच्या आवारातून मागील वर्षी वाळूची गाडी जप्त करण्यात आली होती. तीही वाळूची गाडी रात्रीच्या वेळी चोरीला गेली होती. आणि आता वाळूसह ट्रॅक्टर चोरीला गेला आहे.