चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याचा संजय राऊतांनी घेतला खरपूस समाचार, राजकीय वर्तुळात खळबळ

अब्दुल कलाम हे अटल बिहारी वाजपेयींचे मास्टरस्ट्रोक होते. मोदी तेव्हा राष्ट्रीय राजकारणात नव्हते. काही लोकं प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेतात आणि त्याचा विनोद होतो. असा टोला राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. तसेच इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती. आताची आणीबाणी ही छुप्या पद्धतीने आहे, तेव्हा फक्त राष्ट्रपतींच्या सहीने लावली होती. असे संजय राऊत म्हणाले.

    पुणे : मोदींनी दिवंगत अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी खास शैलीत चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

    अब्दुल कलाम हे अटल बिहारी वाजपेयींचे मास्टरस्ट्रोक होते. मोदी तेव्हा राष्ट्रीय राजकारणात नव्हते. काही लोकं प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेतात आणि त्याचा विनोद होतो. असा टोला राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. तसेच इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती. आताची आणीबाणी ही छुप्या पद्धतीने आहे, तेव्हा फक्त राष्ट्रपतींच्या सहीने लावली होती. असे संजय राऊत म्हणाले.

    राऊत यांनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर भाष्य केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री दूरदृष्टीचे नेते आहे. भविष्यात कोरोना संकट वाढू शकेल याचा त्यांनी अभ्यास केला होता. म्हणून काही गोष्टी उघडू नये असा त्यांचा आग्रह होता. असे राऊत म्हणाले.