संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त समाधीचा अभिषेक,महापूजा करताना संस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे,वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे.
संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त समाधीचा अभिषेक,महापूजा करताना संस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे,वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे.

वाघोली : श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्ताने श्री क्षेत्र सुदुंबरे येथील संत संताजी जगनाडे महाराज समाधीस अभिषेक आणि महापूजा,सुदुंबरे संस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे,वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली.यावेळी यावर्षीचा पुण्यतिथी उत्सवाचे अध्यक्ष जयंत राऊत आणि उद्घाटक सिद्धेश रत्नपारखी उपस्थित होते.

या वर्षी प्रथमच संत संताजी जगनाडे महाराज समाधी पूजेचे प्रक्षेपण “म्हणे संतू तेली” या फेसबुक पेज द्वारे लाइव्ह करण्यात आले.त्याकामी डॉ.गणेश अंबिके यांचे सहकार्य लाभले.कोरोणा महामारी मुळे यावर्षी अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले त्यामुळे हा जयंती कार्यक्रम साध्या पद्धतीने आणि सर्व नियमांचे पालन करून करण्यात आला.याप्रसंगी सुदुंबरे संस्थानचे कार्याध्यक्ष विजय रत्नपारखी,मुख्य चिटणीस ऍड.राजेश येवले,खजिनदार दत्तात्रय शेलार,चिटणीस आप्पा शेलार,चिटणीस शैलेश मखामले,सुभाष कर्डिले,नागपूर येथील सुभाष घाटे आणि त्यांचे सहकारी समाज बांधव,सिने अभिनेते दत्ता उबाळे,नाना चिलेकर,धनंजय वाठारकर,सचिन काळे,संतोष काळे,ह.भ.प.बाळासाहेब काळे,विणेकरी ह.भ.प.आत्माराम बारमुख,वासुदेव उबाळे,इंदोरीचे माजी सरपंच सुनंदा राऊत,आदी समाज बंधू भगिनी उपस्थित होते. या वेळी कोरोना महामारीचे जागतिक संकट लवकर दूर व्हावे आणि लस उपलब्ध व्हावी,अशी प्रार्थना संत संताजी जगनाडे महाराज यांचे चरणी करण्यात आली.अशी माहिती सुदुंबरे संस्थानचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे,वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे यांनी दिली.

सुदुंबरे संस्थानच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील:उबाळे
सुदुंबरे संस्थानचच्या सर्व संचालक पदाधिकाऱ्यांना विश्वासात एकत्रित घेऊन आम्ही संस्थानच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील आहोत.यावर्षीचा जयंती सोहळा हा कोरोनामुळे इतर कार्यक्रम न करता नियमांचे पालन करून उत्सहात साजरा केला आहे.यावेळी संस्थानच्या सर्व पदाधिकाऱ्यांची साथ लाभली.यापुढे सर्वांच्या साथीने एकजुटीने काम चालू ठेवणार असल्याचे सुदुंबरे संस्थानचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी सांगितले.