कुटुंबाच्या भावनेतून गावचा कारभार : सरपंच अवंतिका शितोळे

  पाटस :  दौंड तालुक्यातील ऐतिहासिक गाव म्हणून पाटस ग्रामपंचायतीच ओळख जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, सरसेनापती महादजी शिंदे, श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गाव म्हणून कसबे पाटस ओळखले जाते. तालुक्यात १७ सदस्य संख्या असलेली एक मोठी ग्रामपंचायत म्हणून ही गणली जाते. सुमारे ३० हजार लोकसंख्येच्या आसपास आणि २५ वाड्यावस्त्यांमध्ये गाव विभागली आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा कारभार मी पाहत आहे. एक महिला जसे आपले घर कुंटूब चालवते, तसे गाव ही माझे एक कुटूंब आहे. या भावनेतून या पदाचा गावचा विकास करण्यासाठी योग्य वापर करणार आहे. शिक्षण, स्थानिकांना रोजगार, ग्रामस्वच्छता, आरोग्य सेवा यांना विशेष प्राधान्य देणार आहे, असे सरपंच अवंतिका शितोळे

  लोकसहभागातून सुसज्ज असे कोविड सेंटर

  आपण ९ फेब्रुवारी २०२१ ला सरपंच पदाचा कारभार हातात घेतला. कामाचा फारशा अनुभव नसला तरीही घरातूनच सामाजिक आणि राजकीय वारसा मिळाला आहे. भीमापाटस साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै, मधुकर शितोळे  (काका) आणि माजी सरपंच निळकंठ शितोळे यांच्याकडून प्रेरणा िमळाली. कोरोनासारख्या महामारीत गाव कोरोनामुक्त कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहे. मागील पाच महिन्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या राेखण्याचे मोठे आव्हान माझ्यासमोर होते. मात्र आरोग्य विभाग, महसलू विभाग, पंचायत समिती, पोलीस प्रशासन यांच्याशी सातत्याने समन्वय साधला. लोकसहभागातून १०० बेडचे सुसज्ज असे कोविड सेंटर उभे केले. सध्या या सेंटरमध्ये परिसरातील गावातील अनेक रूग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. अनेक बाधित रूग्ण या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळत आहेत, असे सरपंच शिताेळे यांनी सांगितले.

  कचरा मुक्त गाव, निर्मल ग्रामचे ध्येय

  सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन विकास कामांचे वाॅर्ड, प्रभागनुसार नियोजन करणे, अंदाजपत्रक काढणे, नवीन कामांना मंजुरी मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणे, सर्व भागात जास्तीत जास्त विकास कामे करणे हे उदिष्ट ठेवून वाटचाल सुरू आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेला बस स्थानक, आरोग्य केंद्राचा प्रश्न, शैक्षणिक समस्या माझ्या कालवधीत मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. गाव कचरा मुक्त करून निर्मलग्राम करण्याचे अापले मुख्य ध्येय आहे. त्यासाठी कचरा प्रकल्प लवकरच राबविणार असून त्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पात आम्ही गावातील सर्व केरकचरा एका जागी गोळा करून त्याच्यावर प्रक्रिया करून कंपोष्ट खत तयार करणार आहे. या खतांचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. अंतर्गत कच्चे रस्ते सिमेंट कांॅक्रीटचे करणे, सांडपाण्यासाठी सर्व भागात भुयारी गटार याेजना राबविणे, स्वच्छ पाणी पुरवठा, गावाला ४२ तास वीज उपलब्ध करून देणार आहे. या विकास कामात वाड्यावस्त्यांना ही न्याय देणार आहे, असे िशताेळे यांनी नमुद केले.

  जास्तीत जास्त विकासकामे करणार

  जिल्हा बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्वशील शितोळे, माजी सरपंच योगेंद्र शितोळे, दौंड पंचायत समितीचे माजी सभापती मंदाकिनी चव्हाण, आशा शितोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शितोळे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सारीका पानसरे, ज्येष्ठ नागरिक माणिक भागवत, सुभाष रंधवे यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त िवकासकामे करण्यात येतील, असा िवश्वास िशताेळे यांनी व्यक्त केला.

  लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांना विरगुंळा िमळावा, यासाठी नैसर्गिक सौंदर्याने भरलेले गार्डन तयार करणार आहे. पाटस सारख्या ऐतिहासिक गाव एक पर्यटनस्थळ बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कामे भरपूर आहेत. कमी वेळात करणं शक्य नाही. मात्र ग्रामस्थांची साथ मिळाल्यास अशक्य नाहीत. सर्व समाजाला सामाजिक न्याय, जातीय सलोखा कसा जोपासता येईल. राजकीय मतभेत, व्यक्तिगत मतभेद विकास कामे करण्याकडे लक्ष राहील.  नागरिकांच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.

  – अवंतिका शिताेळे, सरंपच