निरेच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्नशील : सरपंच तेजश्री काकडे

  नीरा : नीरा म्हणजे पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या आसलेले गाव. तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. अशा या ग्रामपंचायातींवर सरपंच म्हणून मला काम करण्याची संधी ग्रामस्थांनी दिली. बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निरेच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्नशील अाहे. नागरिकांना मुलभूत साेईसुिवधा पुरवून स्वच्छ व सुंदर गाव बनविणार असल्याचा मनाेदय सरपंच तेजश्री काकडे यांनी व्यक्त केला.

  स्वच्छता व पाणी पुरवठ्यावर लक्ष केंद्रित

  सध्या नीरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरु आहेत. सरपंच पदावर आल्यानंतर गावातील स्वच्छता व  स्वच्छ पाणी पुरवठा यावर आम्ही लक्ष केंद्रित केले. सुरूवातीला लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाय योजना राबविल्या.
  फेब्रुवारी २०२१ मध्ये पदभार स्वीकारला. त्यावेळी कोरोना सुरु होता. नुकतीच पहिली लाट ओसरली होती आणि दुसरी लाट सुरु झाली होती. सुरवातीच्या काळात कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढले होते. नीरा गाव आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी बाजार पेठेचे ठिकाण असल्यामुळे गर्दी वाढत होती. त्याच बरोबर नीरा आणि आजूबाजूच्या गावातूनही रुग्ण संख्या वाढू लागली होती. महसूल, पोलीस व आरोग्य प्रशासन यांच्याशी समन्वय साधून विविध उपाय योजना राबवल्या. त्यामुळे साथ िनयंत्रणात अाली, असे सरपंच काकडे यांनी सांिगतले.

  कोरोना रुग्णासाठी विलगीकारण कक्ष

  प्रथम लोकांमध्ये मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे,  शािररिक अंतर राखणे याबाबत प्रबाेधन करण्यात आले. व्यापऱ्यांचे कोरोना टेस्टिंग करण्यात आले. तरी ही कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने अखेर व्यापारी ग्रामस्थ व प्रशासन यांच्या समन्वयाने आठ दिवसाचा जनता कार्फू पाळण्यात आला. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून ५० बेड क्षमतेचे कोविड विलगीकारण कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामुळे आता कोरोना बाधित लोकांना उपचारासाठी जेजुरी, सासवड या लांबच्या गावात जावे लागत नाही. परिसरातील व्यवहार सुरळीत असून अार्थिक नूकसान टळले असल्याचे सरपंच काकडे यांनी नमुद केले.

  पाच कोटी खर्चून पाणीयोजना

  नीरा लोकसंख्येने मोठे गाव असले तरी त्याच क्षेत्रफळ मात्र कमी आहे. त्यातच आजूबाजूच्या गावातील लोक शिक्षण, नोकरी या निमित्त नीरा येथे राहण्यास पसंती देतात. प्रत्यक्ष मतदार किवा नोंद असलेल्या लोकांच्या दुप्पट लोक नीरेत रहातात. त्या दृष्टीने विचार करून पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण इत्यादी बाबत आम्ही नियोजन करीत आहोत.राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावात पाच कोटी रुपये खर्चून योजना राबवण्यात आली होती. मात्र ही योजना बंद पडली होती. ती आता सुरु करण्यात आली आहे. आता राज्य सरकारच्या जलजीवन मिशनच्या मध्यमातून ३.५० कोटी रुपयाची वितरण व्यवस्था राबवण्यात येत आहे. त्यामुळे आता नीरेतील सर्व भागात शुद्ध पाणी पोचणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेचे काम सध्या सुरु आहे. गावातील अंतर्गतरस्ते, स्मशानभूमी, दफनभूमी, सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे सरपंच काकडे यांनी सांिगतले.

  नीरा गावामधील शिवतक्रार हे गावठाण आहे. परंतु नीरा गावठाण नाही. त्यामुळे नीरा गावठाण हद्दवाढ करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या बाबत  उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करत आहेत.  संत ज्ञानेश्वर माऊलीचे पहिले स्नान नीरा नदीत होत असते. त्यासाठी  नीरा नदीवर नवीन घाट बांधण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. लवकरच ही कामे मार्गी लागतील.

  – तेजश्री काकडे, सरपंच

  (शब्दांकन : राहुल शिंदे)