कोरोना बाधितांच्या दरात जिल्हात घटल्याचे समाधानकारक चित्र

महाराष्ट्रात सद्यस्थितीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णसंख्येचा दार अधिक आहे.त्यानंतर जळगाव जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्याचा कोरोनाबाधित सापडण्याचा दर २.२९ टक्के येवढा आहे. त्यापाठोपाठ गोंदीया, भंडारा आणि नंदुरबार जिल्ह्यांचा रुग्णवाढीचा दर हा कमी आहे.

    पुणे: मागील दोन आठवड्यांपासून पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याने मोठा दिलासा निर्माण झाला आहे. गेल्या आठवडयाच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णसंख्येचा दर दोन टक्क्यांनी घटला आहे. दर १५.८३ असून गेल्या आठवड्यात हा दर १७ टक्के होता. रुग्णसंख्या कमी झाल्याने रुग्णालयात सहजपणे बेड उपलब्ध होत आहेत. सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्ण वाढत असले तरी त्यांचे प्रमाणही कमी होत आहे.

    यामुळे काही दिवसांपूर्वी बाधितांच्या दरात राज्यात आघाडीवर असलेला जिल्ह्याचा रुग्णवाढीचा दर हळूहळू आटेक्यात येत आहे. जिल्ह्यात बुधवारी २३ हजार २४९ चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील ३ हजार १२७ जण कोरोनाबाधित आढळले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सापडलेली रुग्णसंख्या ही कमी आहे. यामुळे ही बाब जिल्ह्यासाठी दिलासा देणारी ठरली आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णसंख्येचा दार अधिक आहे.त्यानंतर जळगाव जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्याचा कोरोनाबाधित सापडण्याचा दर २.२९ टक्के येवढा आहे. त्यापाठोपाठ गोंदीया, भंडारा आणि नंदुरबार जिल्ह्यांचा रुग्णवाढीचा दर हा कमी आहे.