
विवाह सोहळ्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यावरदेखील निर्बंध घालण्यात आलेत. लग्न आणि इतर समारंभासाठी जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय. त्यापेक्षा जास्त गर्दी झाली, तर आयोजकांवर आणि कार्यालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होत असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी आज (रविवार) एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत पुण्यातील शाळा, कॉलेज आणि क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललीय. त्याला आळा घालण्यासाठी पुण्यातील शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री श्री. @AjitPawarSpeaks यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचे सविस्तर आदेश लवकरच जारी केली जातील.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) February 21, 2021
विवाह सोहळ्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यावरदेखील निर्बंध घालण्यात आलेत. लग्न आणि इतर समारंभासाठी जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय. त्यापेक्षा जास्त गर्दी झाली, तर आयोजकांवर आणि कार्यालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय.
विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न/समारंभास केवळ २०० जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) February 21, 2021
याबाबतचे सविस्तर आदेश लवकरच जाहीर करण्यात येणार असून तातडीने या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रविवार असल्यामुळे आज बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीच आहे. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्यामुळे आता थेट पुढच्या महिन्यापर्यंत पुण्यातील शाळा, महाविद्यालये आणि खासगी क्लासेस बंद असणार आहेत.
गेल्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि इतर स्थानिक पदाधिकारी आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.