राज्यातील शाळा होणार चूल-धूर मुक्त

शासकीय शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. विद्यार्थी संख्या वाढविण्यासोबत त्यांना सुदृढ ठेवण्यासाठी मध्यान्ह भोजन सुरू करण्यात आले. याकरिता शाळांमध्येच जेवण तयार करण्यात येते. हे जेवण चुलीवरच तयार करण्यात येते.

    पिंपरी :  प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने शाळा चूल व धूर मुक्त करण्याचे धोरण असले तरी आजही राज्यातील हजारो शाळांमध्ये गॅस, सिलिंडर नसल्याने चुलीवर स्वयंपाक तयार करण्यात येत असल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर आता शासनाने गॅस सिलिंडर नसलेल्या शाळांची यादी मागितली आहे.

    शासकीय शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. विद्यार्थी संख्या वाढविण्यासोबत त्यांना सुदृढ ठेवण्यासाठी मध्यान्ह भोजन सुरू करण्यात आले. याकरिता शाळांमध्येच जेवण तयार करण्यात येते. हे जेवण चुलीवरच तयार करण्यात येते. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन प्रदुषणही वाढते. शासनाने चूल – धूर मुक्त अभियान राबवीत शाळांना गॅस, सिलिंडर देण्याची योजना सात वर्षापूर्वी आखली होती. परंतु, अनेक शाळांना याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे आजही चुलीवर स्वयंपाक तयार करण्यात येते. आता शासनाने गॅस, सिलिंडर नसलेल्या शाळांची यादी मागविली असून त्यांना पुरवठा करण्यात येणार आहे. शासनाने शाळांची यादी गॅस, सिलिंडर कंपन्यांना पुरविली आहे. या शाळांना सिलिंडर पुरवून ग्राहक करण्यासाठी या कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली असून ते संपर्क करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.