कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कवठे येमाई ग्रामपंचायतीत सुरक्षिततेची खबरदारी

कवठे येमाई : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे येमाई गावात मागील ६ महिन्यात कोरोनाचे १३ रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीत येणारे अधिकारी,पदाधिकारी व महत्वाचे म्हणजे कामानिमित्ताने सातत्याने गावात संपर्कात असणारे कर्मचारी हे कोरोनापासून सुरक्षित रहावेत व दक्षता म्हणून ग्रामपंचायतीत ताप तपासणी यंत्र,ऑक्सिजन तपासणी यंत्र,कार्यालयीन व परिसर स्वच्छता,सानेटायझिंग,सफाई कर्मचाऱ्यांना मास्क,ग्लोज व इतर सुरक्षिततेचे साहित्य उपब्ध करून देण्यात आले असून ग्रामपंचायतीत उपलब्ध करण्यात आलेल्या यंत्रांद्वारे सर्वांची नियमित तपासणी करण्यात येत असून अधिकारी,पदाधिकारी,कर्मचारी योग्य ती खबरदारी घेत असल्याने कोरोनाच्या संसर्गापासून आजपर्यंत सर्वच जण सुरक्षित असल्याचे सरपंच अरुण मुंजाळ,उपसरपंच वैभवी उघडे,ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड यांनी बोलताना सांगितले. 

 सुमारे १५ हजारांच्या पुढे लोकसंख्या असलेल्या कवठे येमाई गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांची कामानिमित्ताने सतत वर्दळ असते. कर्मचाऱ्यांसह,नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेत उपलब्ध यंत्रांद्वारे तपासणी करण्यात येत असून गरज वाटल्यास पुढील उपचारासाठी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवणार असल्याचे सरपंच मुंजाळ यांनी सांगितले. देशासह राज्यात कोरोनाचा सर्वत्र वाढता असलेला संसर्ग पाहता गावातील नागरिक,दुकानदार,व्यापारी मास्क लावणे,सोशल डिस्टंस पाळणे.परिसर स्वछता या गोष्टी पाळताना दिसत आहेत.

कवठे येमाई गावातील नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने वारंवार भोंगागाडी द्वारे नागरिकांना दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत.कोरोनाचा संसर्ग गावात वाढू नये म्हणून ग्रामपंचायत सातत्याने राबवित असलेले प्रतिबंधात्मक उपाय व योजना नक्कीच कौतुकास्पद आहेत. नागरिकांनी स्वतःबरोबरच इतरांची दक्षता,योग्य ती खबरदारी व सूचनांचे काळजीपूर्वक पालन केल्यास कोरोनास नक्कीच प्रतिबंध बसेल व संसर्ग वाढणार नाही.

डॉ.सुभाष पोकळे , सदस्य,शिरूर पंचायत समिती