बेळगावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना केंद्रीय पथकांमार्फत सुरक्षा द्यावी; आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

शिवसेना बेळगावचे नेते प्रकाश शिरोळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची गंभीर शिवसेनेच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली आहे.  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शिरोळकर यांची दूरध्वनीवरून घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली. मुख्यतः त्यांच्या विरोधात जो हल्ला झाला होता त्याबद्दलच्या आरोपी बद्दल पोलिसांनी काय कारवाई केली आहे? याच्या बद्दल डॉ गोऱ्हे यांनी विचारपूस केली.

    पुणे : शिवसेना बेळगावचे नेते प्रकाश शिरोळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची गंभीर शिवसेनेच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली आहे.  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शिरोळकर यांची दूरध्वनीवरून घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली. मुख्यतः त्यांच्या विरोधात जो हल्ला झाला होता त्याबद्दलच्या आरोपी बद्दल पोलिसांनी काय कारवाई केली आहे? याच्या बद्दल डॉ गोऱ्हे यांनी विचारपूस केली.

    त्यांच्याकडून त्यांनी पोलिसांकडे एफआयआर दखल केला आहे त्यांची प्रत घेऊन त्यानुसार बेळगाव भाग आणि कर्नाटक मधल्या संबंधित पोलीस अधिकार्‍यांकडे डॉ.गोऱ्हे यांनी आरोपींवर कारवाई होण्याच्या सोबतच पुढील सुद्धा कार्यवाही बाबत पाठपुरावा करत आहेत. संबंधित पोलिसांना कडक कार्यवाही बाबत निवेदन देखील डॉ.गोऱ्हे यांनी दिले आहे.

    शिरोळकर यांच्यावर परत असा हल्ला होऊ नयेत याची शक्यता असताना या गुंडावरती काय प्रतिबंधात्मक कारवाई केली ते पोलिसांनी त्यांना कळवावे. शिरोळकर यांना पोलिस संरक्षण केंद्रीय पोलिस दलाच्या मार्फत देण्यात यावे याबद्दलचे निवेदन डॉ.गोऱ्हे ह्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारताचे पोलीस संबंधित गृह सचिव यांना दिले आहे.

    शिरोळकर यांची विचारपूस नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार अरविंद सावंत यांनी केलेली आहे. त्यांच्याशी समन्वय ठेवून प्रकाश शिरोळकर यांना अजून या प्रकारचा त्रास होतोय त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार जास्तीत जास्त काय करू शकेल त्याच्याबद्दल देखील प्रयत्न केला जाणार आहे. मधल्या काळामध्ये श्री शिरोळकर यांचे घर, ऑफिस त्याच्या जवळच्या पोलिस स्टेशनचे अधिकाऱ्यांशी डॉ.गोऱ्हे ह्या संवाद साधून पुढे असे होऊ नयेत यासाठी प्रयत्न करा करणार आहेत.