जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो जप्त

मंचर : मंचर पोलिसांनी जनावरांना कत्तलीसाठी घेवुन जाणारा छोटा हत्ती गाडी जप्त केली असुन त्यामध्ये एकुण तीन जनावरे आढळुन आली.याप्रकरणी चार जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर शहरातील पुणे-नाशिक रस्त्यावरील गेटवेल हॉस्पिटलच्या समोर छोटा हत्ती गाडी क्रमांक एमएच १४ जीडी ५८०५ ही गाडी घेवुन वाहनचालक गणेश महादेव मिठे (वय ३४) राहणार जाधववाडी सावतामाळी मंदिराजवळ चिखली (ता.हवेली) यांनी गाडीमध्ये १ जर्शी गाई,२ गावरान बैल असे एकुण तीन जनावरे घेवुन कत्तलीसाठी घेवुन जात असताना मिळुन आली.
सदर जनावरे कत्तलीसाठी शाबीर कुरेशी राहणार िपपरी, सुरज संजय जाधव राहणार जुन्नर यांच्या आर्थिक फायद्यासाठी संगमनेर येथे मुद्दसर कुरेशी राहणार संगमनेर यांच्याकडे घेवुन जात असताना मिळुन आल्याप्रकरणी संबधिताच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान महेश भालेकर यांनी फिर्याद दिली आहे. जनावरांचे वैद्यकीय अधिकारी यांचे फिटनेस प्रमाणपत्र न धेता तसेच जनावरे खरेदी केल्याच्या पावत्या जवळ न बाळगल्याप्रकरणी भारतीय प्राणी संरक्षण अधिनियम १९६० चे कलम ११ अ आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण १९९५ चे कलम ५ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान राजेंद्र हिले करत आहे.