नाव समितीच्या सदस्यांची मुख्यसभेत निवड;भाजपच्या धनराज घाेगरे यांच्यासह आठ नगरसेवकांचा समावेश

महापालिकेचे रुग्णालय, व्यायामशाळा इतर इमारती, बांधण्यात येणारे रस्ते, चाैक आदींना नाव देण्याची शिफारस या नाव समितीमार्फत केली जाते. या समितीमधील सदस्यांची संख्या तेरा असुन, प्रत्येक पक्षाच्या संख्याबळानुसार प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांची निवड या समितीसाठी केली जाते.

पुणे: महापालिकेच्या नाव समितीच्या सदस्यांची साेमवारी मुख्यसभेत निवड केली गेली. यात भाजपच्या धनराज घाेगरे यांच्यासह आठ नगरसेवकांचा समावेश आहे. पक्षबळानुसार इतर पक्षाच्या नगरसेवकांची निवड केली गेली.
महापालिकेचे रुग्णालय, व्यायामशाळा इतर इमारती, बांधण्यात येणारे रस्ते, चाैक आदींना नाव देण्याची शिफारस या नाव समितीमार्फत केली जाते. या समितीमधील सदस्यांची संख्या तेरा असुन, प्रत्येक पक्षाच्या संख्याबळानुसार प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांची निवड या समितीसाठी केली जाते. साेमवारी झालेल्या सर्वसाधारणसभेत यासंदर्भातील प्रस्ताव मंजुर केला गेला. महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी नाव समितीकरीता प्रत्येक पक्षाकडून नावे मागविली हाेती. पक्षांनी सुचविलेल्या नावे महापाैर माेहाेळ यांनी जाहीर केली. यामध्ये भाजपचे धनराज घाेगरे, वासंती जाधव, अनुसया चव्हाण, एैश्वर्या जाधव, आदित्य माळवे, सम्राट थाेरात, राजश्री नवले, राजाभाऊ लायगुडे यांना संधी देण्यात आली. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या गणेश ढाेरे, भैय्यासाहेब जाधव, प्रिया गदादे, काॅंग्रेसकडून अजित दरेकर आणि शिवसेनेकडून विशाल धनवडे यांना संधी दिली गेली आहे. भाजपकडून पहील्यांदाच नगरसेवक म्हणून निवडुन आलेल्यांना या समितीत संधी देऊन त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.