तळेगाव ढमढेरेच्या तीन विध्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ शाळेच्या तीन विध्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी नुकतीच निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापिका साधना वाघोले यांनी दिली आहे.

                        तळेगाव ढमढेरे येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता.  नवोदय विद्यालय निवडीसाठी बुद्धिमत्ता, गणित, भाषा अशा तीन विषयांची ८० गुणांची परीक्षा घेतली जाते. सदर परीक्षेनंतर सीबीएससीच्या अंतर्गत विध्यार्थी निवड केली जाते. जवाहर नवोदय विद्यालयात दरवर्षी इयत्ता सहावी प्रवेशासाठी एकूण ८० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यामध्ये ४० टक्के मुली व ६० टक्के मुले अशी निवड केली जाते. यामध्ये निवड झाल्यानंतर इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत जवाहर नविद्यालयात केंद्र शासनाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांच्या राहण्याची, जेवणाची सोय विनामूल्य केली जाते. तर यामध्ये तळेगाव ढमढेरेतील कुमार जयसिंगराव ढमढेरे विद्यालयातील कैवल्य आखाडे, यशोदिप मोडक, संचित पिंगळे या तीन विध्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षिका नुतन तोडकर व शिक्षक जयवंत भुजबळ यांनी मार्गदर्शन केले.